शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विशेष दर्जासाठी विरियातोंचे लोकसभेत खासगी विधेयक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:38 IST

विरियातो म्हणाले की, 'विशेष दर्जा आम्ही पैशांसाठी मागत नाही, तर गोव्याची अस्मिता, संस्कृती अबाधित राहावी यासाठी मागत आहोत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याला विशेष दर्जा मिळावा, यासाठी दक्षिण गोव्याचे काँग्रेसी खासदार विरियातो फर्नाडिस यांनी लोकसभेत खासगी विधेयक सादर केले आहे.

पत्रकार परिषदेत विरियातो यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास खलप, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा उपस्थित होते. विरियातो म्हणाले की, 'लोकसभेत मी संविधान (सुधारणा) विधेयक, २०२५ सादर केले असून ज्यामध्ये गोव्याची जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी 'विशेष दर्जा' मिळावा, अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले की, 'घटनेत नवीन कलम ३७१-आय (ए) प्रस्तावित करण्यात आले आहे. गोवा शाश्वत विकास मंडळ स्थापन केले जावे, असा त्यांचा प्रस्ताव आहे. कुडतरी येथे या मंडळाचे मुख्यालय असेल व मुख्यमंत्र्यांना मंडळाचे अध्यक्षपद देता येईल.खासदार, विरोधी पक्षनेते आणि गोमंतकीय वंशाचे तज्ज्ञ या मंडळावर असावेत. हे मंडळ शाश्वत विकासावर लक्ष ठेवेल, संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करेल, कोकणीला प्रोत्साहन देईल आणि लोकसंख्याशास्त्रीय आणि सांस्कृतिक ओळख जपेल. जमीन, संस्कृती आणि ओळखीशी संबंधित गोव्यातील लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी १८६७ च्या नागरी संहिता आणि इतर संबंधित निकषांवर आधारित "गोव्यातील गोवेकर" ची कायदेशीर व्याख्यादेखील विधेयकात देण्यात आली मूळ आहे.'

गोव्याची अस्मिता, संस्कृतीसाठी मागणी

विरियातो म्हणाले की, 'विशेष दर्जा आम्ही पैशांसाठी मागत नाही, तर गोव्याची अस्मिता, संस्कृती अबाधित राहावी यासाठी मागत आहोत तसेच 'गोव्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले आहे. या नद्या गोव्याला परत मिळाव्यात यासाठीही अन्य एक विधेयक सादर केलेले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : MP Fernandes Introduces Private Bill in Lok Sabha for Goa's Special Status

Web Summary : MP Viriato Fernandes introduced a private bill in Lok Sabha seeking special status for Goa. The bill aims to protect Goa's land, environment, culture, and rights of its people, proposing a new article 371-I (A) in the constitution and a Goa Sustainable Development Board. He also seeks nationalized rivers back.
टॅग्स :goaगोवाParliamentसंसदcongressकाँग्रेस