काँग्रेसच्या आमदारांत महायुतीप्रश्नी मतभिन्नता
By Admin | Updated: November 13, 2015 02:15 IST2015-11-13T02:15:37+5:302015-11-13T02:15:51+5:30
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधारी भाजपविरुद्ध लढण्यासाठी बिहारच्या धर्तीवर गोव्यातही काँग्रेसने

काँग्रेसच्या आमदारांत महायुतीप्रश्नी मतभिन्नता
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधारी भाजपविरुद्ध लढण्यासाठी बिहारच्या धर्तीवर गोव्यातही काँग्रेसने महायुती स्थापन करावी, अशा प्रकारच्या सूचना काही घटक करू
लागले तरी, काँग्रेसच्या आमदारांमध्ये मात्र याविषयी मतभिन्नता आहे.
सर्व विरोधी पक्षांनी व अपक्ष आमदारांनी २०१७च्या निवडणुकीवेळी एकत्र यावे, अशा प्रकारच्या सूचना बिहारच्या निवडणूक निकालानंतर अनेकजण करत आहेत. मात्र, काँग्रेस पक्षात त्याबाबत वेगळा मतप्रवाह आहे. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो अशा प्रकारच्या महायुतीसाठी तयार नाहीत. शिवाय, काँग्रेसचे आमदार पांडुरंग मडकईकर व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सदेखील महायुती करण्याची गरज नाही अशाच मताचे आहेत. अन्य काही काँग्रेस आमदार मात्र बिहारच्या धर्तीवर गोव्यातही महागठबंधन व्हावे,
अशी भूमिका घेत आहेत.
आमदार मडकईकर यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले की, बिहारमध्ये नितीश कुमार व लालू प्रसाद यादव यांचे पक्ष अत्यंत प्रभावी आहेत. ते पक्ष राज्यव्यापी आहेत. गोव्यात भाजप व काँग्रेसनंतर एकही पक्ष राज्यव्यापी व खूप प्रभावी असा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वहीन झाला आहे व म.गो. पक्षाशी काँग्रेस पक्ष युती करू शकत नाही. बिहारमध्ये काँग्रेससमोर अन्य मोठ्या प्रादेशिक पक्षांशी युती करण्याशिवाय पर्यायच नव्हता.
मडकईकर म्हणाले की, गोव्यात काँग्रेसने स्वबळावर लढून स्वत:ची शक्ती दाखवावी. काही
(पान २ वर)