शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

गोव्यात अमित शहांच्या सभेवेळी काँग्रेस नेत्यांची धरपकड; प्रदेशाध्यक्षांसह इतरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By किशोर कुबल | Updated: April 16, 2023 17:26 IST

शहा यांच्या सभेला गालबोट लागू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पणजी : म्हादईच्या बाबतीत केलेल्या विधानाचा निषेध म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेच्या ठिकाणी निदर्शने करण्यासाठी येताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व पक्षाच्या अन्य नेत्यांना बाणस्तारी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. शहा यांच्या सभेला गालबोट लागू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काँग्रेसी नेत्यांना पोलिसांनी बाणस्तारी येथेच अडवले. 

मंगळवारी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकम टागोर यांनी प्रदेश राज्यकार्य करण्याच्या घेतलेल्या बैठकीत अमित शहांच्या सभेवेळी जोरदार निदर्शने करण्याचे ठरले होते. पाटकर यांच्यासह कॅप्टन विरियातो फर्नांडिस मोरेनो रीबेलो, सावियो डिसिल्वा, टोनी डायस व इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही काँग्रेसी नेत्यांना ते आहेत तेथे स्थानबद्ध करण्यात. प्रदेश काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर हे त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. पोलिसांनी तेथेच त्यांना स्थानबद्ध केले. पोलीस सकाळपासून माझ्या मागावर होते असे पणजीकर यांनी लोकमतला सांगितले.

शहा यांच्या सभेच्या ठिकाणी निदर्शने करण्याचा निर्णय मंगळवारी झाला होता. कर्नाटकला म्हादईवर पाटबंधारे प्रकल्पांसाठी डीपीआर मंजुरी व पाणी वळवण्यास गोव्याच्या सहमतीने मंजुरी दिलेली आहे, असे विधान शहा यांनी कर्नाटकात केले होते. त्याचा निषेध म्हणून त्यांच्या गोवा भेटीच्या वेळी निदर्शने करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. सावंत सरकारने म्हादई कर्नाटकला विकली आणि शहा यांनी तसे स्पष्टपणे बेळगावच्या सभेत सांगितल्याने आणखी त्यांचे स्वागत कोणत्या तोंडाने करीत आहात? असा काँग्रेसचा सवाल आहे.दरम्यान महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष बीना शांताराम नाईक, प्रदीप नाईक श्रीनिवास खलप, नितीन चोपडेकर व इतरांना फर्मागुढी येथे ताब्यात घेण्यात आले.

ही अघोषित हुकुमशाही - पाटकरपोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, ही अघोषित हुकूमशाही आहे व या कारवाईचा मी तीव्र निषेध करतो. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपाAmit Shahअमित शाह