शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

गोव्यात फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची काँग्रेसची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 20:15 IST

फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. फॉर्मेलिनयुक्त मासळी बाजारात आणून लाखो लोकांच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे.

पणजी : फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. फॉर्मेलिनयुक्त मासळी बाजारात आणून लाखो लोकांच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार असून किमान दोन केबिनेट मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केला असून चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

चोडणकर म्हणतात की, एफडीएच्या मडगांव येथील महिला अधिका-याने दिलेला अहवाल खात्याच्या संचालक तसेच आरोग्यमंत्र्यांनी बाजुला ठेवून उलट या अधिका-यालाच लक्ष्य बनविले. या प्रामाणिक अधिका-याचा मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणात खरे तर अन्न व औषध खातेच मुख्य आरोपी ठरते आणि आरोग्यमंत्री संशयाच्या घे-यात येतात. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी या एकूण प्रकरणाची चौकशी करावी. 

चोडणकर म्हणतात की, तामिळनाडू, केरळ, गुजरात येथून आयात होणारी मासळी गोवेकरांच्या ताटात पडेपर्यंत १0 ते १५ दिवस लागतात. रसायनाशिवाय एवढे दिवस ही मासळी टीकून राहणे कठीण आहे. त्यामुळे फॉर्मेलिनसारख्या घातक रसायनांचा वापर होतो, हे निश्चित असे चोडणकर यांचे मत आहे. 

एफएसएसएआयचे अधिकारी भास्कर यांनी फॉर्मेलिनच्या बाबतीत मर्यादेबाबत केला जाणारा दावा खोडून काढल्याने मंत्र्यांनी त्यावरही आपले मत व्यक्त करावे, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे. मंत्री विश्वजित राणे यांनी मडगांवच्या एसजीपीडीए मार्केटमध्ये गाजावाजा करुन मासळीची तपासणी करुन घेतली. परंतु सासष्टीतील एकाही लोकप्रतिनिधीला बोलावले नाही. लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. परंतु सरकारला याबाबत उघडे पाडण्याच्याबाबतीत काँग्रेसला कोणीही रोखू शकणार नाही, असे चोडणकर म्हणतात. एफडीएचा पर्दाफाश करणाºयांवर गुन्हे नोंदविण्याच्या धमक्या मंत्री देतात. परंतु गोमंतकीयांना फॉर्मेलिनयुक्त मासळी पुरविणा-या माफियांविरुध्द मात्र एकही गुन्हा नोंद केला जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

फॉर्मेलिनयुक्त मासळीची भीती अजूनही गोमंतकीयांच्या मनात आहे. त्यामुळे जोपर्यंत सुरक्षा उपाययोजना होत नाहीत. तोपर्यंत मासळीच्या आयातीवर बंदी घालावी, या मागणीचा चोडणकर यांनी पुनरुच्चार केला आहे. अन्य राज्यांमधून गोव्यात आयात केली जाणारी मासळी टिकून रहावी यासाठी या मासळीला फॉर्मेलिन लावले जात असल्याचे गेल्या जुर्ल रोजी उघड झाले होते. फॉर्मेलिन हे रसायन मानवी पार्थिव टिकून रहावे यासाठी मृतदेहावर लावले जाते. फॉर्मेलिनयुक्त मासळीचे सेवन केल्यास ते आरोग्याला धोकादायक ठरु शकते.  

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस