शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा उमेदवारी अर्ज सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 14:05 IST

काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी उमेदवारी अर्ज सादर केला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी उमेदवारी अर्ज सादर केला. भाजपाने आमदारांची फोडाफोडी करुन अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण चालवले आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात या विषयावरुन भाजपाला उघडे पाडू, असा इशारा दिला आहे.

पणजी - काँग्रेसचेगोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी उमेदवारी अर्ज सादर केला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर तसेच माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार दिगंबर कामत, रवी नाईक तसेच पक्षाचे इतर आमदार, पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते व काँग्रेसप्रणित एनएसयुआय संघटनेचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. 

भाजपाने आमदारांची फोडाफोडी करुन अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण चालवले आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला असून आगामी लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात या विषयावरुन भाजपाला उघडे पाडू, असा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘भाजपाने आरंभलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. आमदार फोडून लोकांनी दिलेल्या कौलाचा भाजपा अवमान करीत आहे. एका अर्थी भाजपाने लोकांशी संघर्षाची भूमिका घेतली असून त्यामुळे या पक्षाला आगामी निवडणुकीत धडा शिकवण्याचा चंग लोकांनी बांधला आहे.’

चोडणकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात अलीकडेच सायकल यात्रा काढली. लोकांकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन हे उद्या मंगळवारी २ रोजी सकाळी ११.३0 वाजता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करतील. रविवारी (31 मार्च) सार्दिन यांच्या समर्थनार्थ दक्षिण जिल्हा काँग्रेस समितीने पक्षाच्या दक्षिण गोव्यातील आमदार, पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgoaगोवाPoliticsराजकारणcongressकाँग्रेस