लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'लोकमत'च्या गोवन ऑफ द इयर २०२५ सोहळ्यात 'दशकातील सर्वांत यशस्वी नेता' म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सक्षम विधिमंडळपटू म्हणून कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला.
सभापती रमेश तवडकर यांनी हा अभिनंदनाचा ठराव मांडला. 'लोकमत'चा दशकातील सर्वांत यशस्वी नेता म्हणून मुख्यमंत्री व सक्षम विधिमंडळपटू म्हणून आमदार नीलेश काब्राल यांना मिळाल्याबद्दल सभागृहाने त्यांचे अभिनंदन केले. शिवाय दामू नाईक यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड, गोमंतकीय संस्कृती, महिला, युवक सशक्तीकरणातील कामगिरीबद्दल कुडचडे येथील युवा स्वराज स्पोर्टस् व कल्चरल क्लब, स्क्वे राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकाबद्दल खेळाडू सुजल कलशावकर आणि छावा चित्रपटाच्या टीमचेही सभागृहाने अभिनंदन केले.