डिचोलीतही खनिज माल हलविल्याची तक्रार

By Admin | Updated: May 16, 2014 01:06 IST2014-05-16T01:04:37+5:302014-05-16T01:06:01+5:30

पणजी : डिचोली तालुक्यात रात्री अकरा वाजता सेसा गोवा कंपनीच्या यापूर्वीच्या लिज क्षेत्रांमध्ये

Complaint of moving the mineral goods to Dicholi | डिचोलीतही खनिज माल हलविल्याची तक्रार

डिचोलीतही खनिज माल हलविल्याची तक्रार

पणजी : डिचोली तालुक्यात रात्री अकरा वाजता सेसा गोवा कंपनीच्या यापूर्वीच्या लिज क्षेत्रांमध्ये असलेला खनिज माल काढून तो बार्र्जमध्ये भरला जात आहे, अशी तक्रार रमेश गावस यांनी गुरुवारी सकाळी दूरध्वनीवरून खाण खात्याकडे केली. आपण या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करू व तुम्हाला काय ते कळवू, असे अधिकार्‍यांनी गावस यांना सांगितले तरी, गुरुवारी गावस यांच्याशी कुणीच पुन्हा संपर्क साधला नाही. बेकायदा खनिज मालाची वाहतूक होऊच शकत नाही, हे मुख्यमंत्री पर्रीकर यांचे विधान वाचून आपल्याला आश्चर्र्य वाटले. खनिज कंपन्यांची हमी कुणीच देऊ शकत नाही. डिचोलीत गेल्या १ रोजी रात्री अकरा वाजता लिज क्षेत्रातील खनिज माल काढून तो बार्र्जमध्ये भरण्याचा प्रकार सुरू झाला. प्रारंभी एका पंचसदस्याने याबाबत खाण खात्याला कल्पना दिली. त्यानंतरही हा प्रकार सुरू राहिल्यानंतर गुरुवारी आपण खाण खात्याशी संपर्क साधला, असे गावस यांनी सांगितले. सेसाच्या लिज क्षेत्राबाहेर जे डंप आहेत, ते सगळे डंप सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार सरकारच्या मालकीचे झाले आहेत. मात्र, अजूनही लिज क्षेत्राबाहेरील त्या डंपना खाण कंपनीने सुरक्षा पुरवली आहे. तिथे अजूनही खाण कंपनीचे सुरक्षा रक्षक डंपचे रक्षण करत आहेत. लिजबाहेरील डंप सरकारने ताब्यात घेतलेलेच नाहीत हेच यावरून स्पष्ट होत आहे. मायनिंग नियम ३७ व ३८ चा भंग ज्या ज्या कंपन्यांनी केला आहे, त्या सर्वांवर सरकारने विशेष लक्ष देऊन पावले उचलणे गरजेचे आहे, असे गावस म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint of moving the mineral goods to Dicholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.