श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिकविरुद्ध तक्रार

By Admin | Updated: May 30, 2014 02:22 IST2014-05-30T02:20:45+5:302014-05-30T02:22:49+5:30

पणजी : श्रीराम सेनेचे सर्वेसर्वा प्रमोद मुतालिक यांनी यू ट्यूबवर घातलेल्या कथित चिथावणीखोर चित्रफितीला आक्षेप घेत काँग्रेसने शहर पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे.

Complaint against Shriram Sena's Pramod Mutalik | श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिकविरुद्ध तक्रार

श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिकविरुद्ध तक्रार

पणजी : श्रीराम सेनेचे सर्वेसर्वा प्रमोद मुतालिक यांनी यू ट्यूबवर घातलेल्या कथित चिथावणीखोर चित्रफितीला आक्षेप घेत काँग्रेसने शहर पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. सर्व हिंदूंना तलवारी वाटणार आणि जो कोणी तलवारींना विरोध करील त्याच्याविरुद्ध तलवारीचा वापर करण्यासही मागे पुढे पाहिले जाणार नाही, अशा प्रकारचे प्रक्षोभक विधान असलेली मुतालिक यांची चित्रफित यू ट्यूबवर घालण्यात आलेली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते तथा आयोजन सचिव दुर्गादास कामत, वामन चोडणकर, हरिश्चंद्र सावंत व मारिओ पिंटो यांनी ही तक्रार दिली आहे. गेल्या जूनमध्ये रामनाथी येथे हिंदू जनजागृती समितीच्या अधिवेशनात बोलताना मुतालिक यांनी प्रक्षोभक विधाने केली होती, याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे. हिंदू व अल्पसंख्याकांमध्ये भांडण लावून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रक्षोभक वक्तव्याबद्दल मुतालिक यांच्याविरुद्ध भादंसंच्या कलम १५३, १५३ अ, २९५ अ, ५0५ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ आणि ६६ एफ खाली गुन्हे नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. या वेळी दुर्गादास म्हणाले की, कारवाईसाठी आठ दिवसांची मुदत देत आहोत. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint against Shriram Sena's Pramod Mutalik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.