१२५ जणांविरोधात सेसा गोवातर्फे तक्रार
By Admin | Updated: December 6, 2015 01:41 IST2015-12-06T01:41:25+5:302015-12-06T01:41:41+5:30
डिचोली : शुक्रवारी सुर्ल व बॉम्बे रोड परिसरात झालेल्या ट्रकमालकांच्या आंदोलनप्रकरणी सेसा वेदान्ताचे व्यवस्थापक

१२५ जणांविरोधात सेसा गोवातर्फे तक्रार
डिचोली : शुक्रवारी सुर्ल व बॉम्बे रोड परिसरात झालेल्या ट्रकमालकांच्या आंदोलनप्रकरणी सेसा वेदान्ताचे व्यवस्थापक अब्दुल्ला खान यांनी सुमारे
१२५ जणांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.
ट्रकमालक संघटनेच्या सुमारे १२५ जणांनी सुमारे १० ट्रकांवर दगडफेक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ट्रकचालकांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच एका ट्रकला आग लावल्याची तक्रारही नोंदवण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी सायंकाळी ६.३० वा. सेसा गोवाच्या अधिकाऱ्यांचीही अडवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज काणकोणकर तपास करीत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभर बॉम्बे रोड येथे ट्रकमालक संघटनेने आंदोलन केल्यानंतर शनिवारी सकाळीच पोलिसंनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा व अटक करण्यासाठीची जय्यत तयारी केली. सकाळी लोक जमावाने येऊ लागले. मात्र, त्यानंतर पोलिसांचा पवित्रा बघून या लोकांनी आपला मोर्चा उसगावकडे वळवला. त्या ठिकाणी त्यांनी बैठक घेतली व त्यानंतर दुपारी रॅलीने पुन्हा सर्वजण पाळी येथे आल्याचे पोलिसांनी सांगितले. शांततेने हे लोक येथे जमले व त्यानंतर उसगाव येथे गेल्याचे सांगितले. पुन्हा सोमवारी आंदोलन होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)