खनिज वाहतूक दरांसाठी समिती
By Admin | Updated: December 17, 2015 01:38 IST2015-12-17T01:38:20+5:302015-12-17T01:38:55+5:30
पणजी : राज्यातील खाणग्रस्त भागात ट्रकांकडून केल्या जाणाऱ्या खनिजाच्या वाहतुकीसाठी सेसा गोवा कंपनीने जो दर

खनिज वाहतूक दरांसाठी समिती
पणजी : राज्यातील खाणग्रस्त भागात ट्रकांकडून केल्या जाणाऱ्या खनिजाच्या वाहतुकीसाठी सेसा गोवा कंपनीने जो दर दिला आहे, त्याविषयी वाद असल्याने या दराच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तयार झाले आहेत.
साखळी मतदारसंघातून सेसा गोवा कंपनीची खनिज वाहतूक पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. मात्र, ट्रकमालक संघटनेचा या वाहतुकीस विरोध आहे. आपले ट्रक वाहतुकीसाठी वापरावे; पण प्रति टन आठ रुपये हा दर आम्हाला मान्य नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेचे सदस्य असलेले ट्रकमालक सध्या खनिज वाहतूक करत नाहीत. त्यांनी बंदच पुकारला आहे. सेसा गोवा कंपनी दरवाढ करून देण्यास तयार नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासारखी स्थिती खाणपट्ट्यात तयार झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो, विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी बुधवारी डिचोली-साखळीत जाऊन ट्रकमालकांची भेट घेतली. सेसा गोवा कंपनी व ट्रकमालकांचा संघर्ष त्यांनी अनुभवला. फालेरो, राणे, सरचिटणीस सुनील कवठणकर व नितीन सामंत यांनी मग दरवाढीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आल्तिनो येथे शासकीय बंगल्यावर मुख्यमंत्री पार्सेकर यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी तिथे सेसा गोवा (पान ४ वर)