चावडीत सांडपाणी उघड्यावर व्यापारी- नागरीक त्रस्त; रोगराईची भीती

By Admin | Updated: May 8, 2014 01:25 IST2014-05-08T01:22:30+5:302014-05-08T01:25:18+5:30

काणकोण : चावडी-काणकोण येथील रॉयल प्लाझा निवासी इमारतीच्या सॉकपिट (सांडपाणी टाकी)मधून वाहणारे पाणी सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे या पाण्याचा त्रास स्थानिक व्यापारी व नागरिकांना होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही समस्या असून, त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. पावसाळा जवळ आल्याने ही समस्या अशीच कायम राहिल्यास रोगराई पसरण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे.

Commercial waste of the sewage open; Disease of pandemic | चावडीत सांडपाणी उघड्यावर व्यापारी- नागरीक त्रस्त; रोगराईची भीती

चावडीत सांडपाणी उघड्यावर व्यापारी- नागरीक त्रस्त; रोगराईची भीती

काणकोण : चावडी-काणकोण येथील रॉयल प्लाझा निवासी इमारतीच्या सॉकपिट (सांडपाणी टाकी)मधून वाहणारे पाणी सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे या पाण्याचा त्रास स्थानिक व्यापारी व नागरिकांना होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही समस्या असून, त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. पावसाळा जवळ आल्याने ही समस्या अशीच कायम राहिल्यास रोगराई पसरण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे.
यासंबंधी या इमारतीचे विकासक हेमंत ग्रासिएस यांना विचारले असता, या इमारतीत राहणार्‍या सर्वांना फ्लॅटचा मालकी हक्क दिला आहे. या इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी व इतर कामांसाठी फ्लॅटधारकांनी पुढाकार घ्यायला हवा. या इमारतीत राहणार्‍या सर्व फ्लॅटधारकांची दोनवेळा बैठक घेऊन त्यांना सोसायटी स्थापन करण्याची सूचना केली होती. अथवा महिन्याला प्रत्येकी शंभर रुपये काढून इमारतीचे दुरुस्तीकाम करून घ्यायला सांगितले होते. मात्र, ही सूचना कोणीच पाळली नाही असे सांगून त्यांनी हात झटकले.
यासंबंधी फ्लॅटधारक बबेश बोरकर यांना विचारले असता, विकासक म्हणून ग्रासिएस यांनी हात झटकले आहेत. मात्र ते या प्रभागाचे नगरसेवक सुध्दा आहेत. चावडी प्रभाग स्वच्छ ठेवावा ही त्यांची जबाबदारी नव्हे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
 

Web Title: Commercial waste of the sewage open; Disease of pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.