थंडी गुलाबी...
By Admin | Updated: December 2, 2014 00:57 IST2014-12-02T00:55:17+5:302014-12-02T00:57:22+5:30
पणजी : मावळता आठवडा सर्वात थंड आठवडा ठरल्याचे हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या आठवड्यात तापमान १८.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली

थंडी गुलाबी...
पणजी : मावळता आठवडा सर्वात थंड आठवडा ठरल्याचे हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या आठवड्यात तापमान १८.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आल्यामुळे कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली आहे.
हिवाळा सुरू झाल्यापासून २९ नोव्हेंबर हा सर्वात थंड दिवस ठरला आहे. या दिवशी कमाल तापमान ३२.९ डिग्री सेल्सिअस, तर किमान तापमान १८.५ डिग्री सेल्सिअस एवढे होते. गतवर्षीच्या हिवाळ्यातील या दिवशीच्या तापमानापेक्षा ते ३ डिग्री सेल्सिअस खाली आले होते. २४ नोव्हेंबर रोजी किमान तापमान २२ डिग्री एवढे होते. त्यानंतर सतत पाच दिवस ते खाली आले आणि २९ रोजी सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. केवळ २९ रोजीच नव्हे, तर त्या आठवड्यात सलग ४ दिवस तापमान खाली राहिले, अशी माहिती हवामान खात्याच्या संचालक व्ही. के. मिनी यांनी दिली. सोमवारी तापमान सामान्य होते. आणखी काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता मिनी यांनी वर्तविली. (प्रतिनिधी)