किनारपट्टीत खंडणीराज

By Admin | Updated: December 9, 2014 00:56 IST2014-12-09T00:49:41+5:302014-12-09T00:56:18+5:30

पणजी : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा अनेक राजकारण्यांकडे उठबस असलेला, त्यातही धक्कादायक म्हणजे तो विद्यमान सरकारमधील एका मंत्र्याचा जानी दोस्त आहे.

Coastal tribal kingdom | किनारपट्टीत खंडणीराज

किनारपट्टीत खंडणीराज

पणजी : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा अनेक राजकारण्यांकडे उठबस असलेला, त्यातही धक्कादायक म्हणजे तो विद्यमान सरकारमधील एका मंत्र्याचा जानी दोस्त आहे. किनारपट्टीत अनेक राजकारण्यांनी सध्या धुमाकूळ घातला असून खंडणीबहाद्दर पंच सदस्यांसह अन्य राजकारण्यांनाही लोक कंटाळले आहेत.
भाजपचे आमदार लोबो यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा विविध प्रकारच्या गोष्टींसाठी हडफडे पंचायत क्षेत्रात व एकूणच कळंगुट मतदारसंघात प्रसिद्ध आहे. हा हल्लेखोर आपल्याकडे एक लाख रुपये मागत होता, असे लोबो सांगतात. लोबो यांच्याकडे तो एक लाख रुपये का मागत होता, हे सखोलपणे व गंभीरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न जर पोलिसांनी केला तर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडेल, अशी चर्चा हडफडे पंचायत क्षेत्रात सुरू आहे.
कळंगुटमध्ये खंडणीराज हे गेल्या पंधरा वर्षांपासून जास्त वाढले आहे. एखादा प्रकल्प येऊ लागला की, त्या प्रकल्पाची पंचायत अडवणूक सुरू करते. मग पंच सदस्य समझोता करतात व पैसे उकळतात. एखाद्या पंचायतीचे जर सात पंच सदस्य असतील, तर त्यापैकी एकटा प्रकल्पाच्या मालकांकडून प्रोटेक्शन मनी मागतो. आपल्याकडे पैसे द्या, आपण ते सर्व पंच सदस्यांना वाटतो व तुम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्याही मिळवून देतो, असे प्रोटेक्शन मनी मागणारा पंच सदस्य सांगतो. त्यानंतर प्रकल्प मालक पैसे काढून देतो. अशा पद्धतीने व्यवहार सुरू आहेत. मात्र, सर्व पंच सदस्यांना बायपास करून एखाद्या मोठ्या राजकारण्याने स्वत:च प्रोटेक्शन मनी घेतला की, मग वाद सुरू होतात. कळंगुट मतदारसंघात अशा प्रकारचे वाद वाढू
लागले आहेत. यापूर्वीही अशा वादांमधून काहीजणांवर हल्ले झालेले आहेत.
कळंगुट मतदारसंघात एका हॉटेलसाठी रस्ता बांधण्याकरिता ८० लाख रुपये काही राजकारण्यांनी मिळून घेतल्याची जोरदार चर्चा आता सुरू आहे. सात पंच सदस्यांना त्या ८० लाख रुपयांतील प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. हा विषयदेखील या मतदारसंघात वादाचा बनला आहे. हॉटेलकडून पैसे कुणी घेतले, हे अनेकांना ठाऊक आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Coastal tribal kingdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.