शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात प्रशासन कोलडमल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 18:20 IST

काँग्रेस आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट

पणजी : गोव्यात प्रशासन कोलमडल्याने राज्यपालांनी आपले घटनात्मक अधिकार वापरुन पर्रीकर सरकावर कारवाई करावी आणि काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेस आमदार, पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची राजभवनवर भेट घेऊन केली. गेल्या सहा महिन्यात काँग्रेसी शिष्टमंडळ तिसऱ्यांदा राज्यपालांना भेटले आहे. 

भेट घेऊन परतल्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात सरकार अस्तित्त्वात नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की,‘विकासकामे ठप्प झालेली आहेत. केवळ महामार्गांचे तेवढे काम दिसते. राज्यात उर्वरित ठिकाणी कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. केरळमध्ये प्रलयंकारी पुराने झालेल्या हानीत त्या राज्याला १५ वर्षे मागे नेले. गोव्यात सरकार आजारी पडल्याने विकास खुंटला असून राज्याला मागे नेले आहे. अनेक ज्वलंत प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यायला सरकार तयार नाही. मुख्यमंत्र्यांसह तीन आमदार आजारी असून सरकारचे कामच ठप्प झाले आहे आणि विकासाला खीळ बसला आहे.’

काँग्रेसचे १६ पैकी ९ आमदार या शिष्टमंडळात उपस्थित होते. यात विरोधी नेते कवळेकर यांच्यासह दिगंबर कामत, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर, विल्फ्रेड डिसा, जेनिफर मोन्सेरात, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्स व क्लाफासियो डायस यांचा समावेश होता. काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हेही उपस्थित होते. 

 भाजपचे आमदार संपर्कात : चेल्लाकुमार चेल्लाकुमार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेसचे सर्व सोळाही आमदार एकसंध असल्याचा व उलट भाजपचेच अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, भाजप आमदार सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत आणि ते काँग्रेसमध्ये येऊ पहात आहेत. काँग्रेसी आमदार फुटणार असल्याच्या अफवा भाजपच पसरवित असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सभापतींनी झेंडावंदन केल्याने त्यास आक्षेप घेऊन चेल्लाकुमार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत क्रमांक दोनच्या किंवा अन्य मंत्र्याकडे ही जबाबदारी यायला हवी होती. सभापतींनी झेंडावंदन केल्याने त्यांचा पक्षपात सिध्द झालेला आहे त्यामुळे प्रमोद सावंत यांनी सभापतीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही चेल्लाकुमार यांनी केली. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरcongressकाँग्रेसBJPभाजपा