शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांना आरोग्याची माहिती गोपनीय ठेवण्याचा हक्क; गोवा सरकारचा कोर्टात युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:49 IST

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासंबंधीच्या याचिकेवर गोवा सरकारचा युक्तिवाद

पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आरोग्यविषयक माहिती गोपनीय ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. ते मुख्यमंत्री झाले तरी शेवटी ते एक नागरिक आहेत असा युक्तीवाद अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठासमोर केला. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य विषयक माहिती उघड करण्यासंबधीच्या लोकांचो आधार संघटनेचे निमंत्रक ट्रॉजन डिमेलो यांच्या याचिकेवर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. 

सुनावणी दरम्यान युक्तीवाद करताना ट्रॉजन डिमेलो यांच्या याचिकेच्या वैधतेवरच अ‍ॅडव्होकेट जनरल लवंदे यांनी बोट ठेवले. व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना आव्हान देणारी याचिका असल्याचा त्यांचा दावा होता. आरोग्य विषयक माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही तो आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणात मुख्य सचिवांना प्रतिज्ञापत्र  सादर करावे लागणार आहे. 

खंडपीठात केलेल्या युक्तिवादात डिमेलो यांच्या वकिलांनी घटनेच्या तिसऱ्या २२६ व्या कलमाचा निर्वाळा देत मुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद असल्याचे स्पष्ट केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आरोग्य विषयक माहिती जाणून घेण्याचा लोकांना अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आजाराचा राज्याच्या प्रशासनावर परिणाम होत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्र्यांची बोगस स्वाक्षरी करून अनेक फायली पुढे रेटल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यही खालावल्यामुळे ते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. अशा वेळी प्रशासकीय अधिकारी व इतर त्याचा गैरफायदा घेतात, असे याचिकेत म्हटले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांच्या पथकाने करावी व मुख्यमंत्री खरोखरच निर्णय घेण्यासाठी कार्यक्षम आहेत की नाहीत याची शहनिशा करावी, अशी मागणी त्यांनी मूळ याचिकेत केली आहे. राज्यघटनेच्या विविध कलमांचा निर्वाळा देतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध आदेशांवरही न्यायालाचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी गुरूवारी होणार आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाHealthआरोग्यBJPभाजपा