शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आमरण उपोषण- राष्ट्रवादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 18:37 IST

आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

म्हापसा : मागील ९ महिन्यांपासून आजारी असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणाचे परिणाम राज्याच्या कारभारावर झाले आहेत. प्रशासन ठप्प झाले आहे. राज्यावर असलेल्या कर्जाची रक्कम वाढत आहे. अशावेळी जनतेचे हित विचारात घेवून मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अन्यथा पणजीतील आझाद मैदानावर आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय बर्डे यांनी दिला आहे. सध्या दिल्लीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे विविध प्रस्तावांवर निर्णयावर मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळवण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांना दिल्लीत जावे लागते. त्यांच्या आजारपणामुळे लोकांकडून विविध कराच्या रुपात जमा झालेल्या पैशांची नाहक उधळपट्टी सुरु आहे. ही उधळपट्टी त्वरित थांबवणे गरजेचे आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी गोव्यात येवून उपचार सुरु करावे असाही सल्ला बर्डे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसात राजीनामा सादर न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. बर्डे यांच्या आमरण उपोषणाला पक्षाच्या मान्यतेसंबंधी तसेच विधानसभेतील त्यांच्या एकमेव आमदाराच्या सहकार्यासंबंधी विचारले असता पक्षश्रेष्ठींच्या सुचनेवरुन आपण हे विधान करीत असल्याचे ते म्हणाले. आपल्या भूमिकेविषयी पक्षाच्या आमदाराच्या सहकार्याची, प्रदेश राष्ट्रवादीच्या भूमिकेची कसल्याच प्रकारची माहिती आपल्याला नसल्याचेही त्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलवण्यासंबंधी काँग्रेस पक्षाने केलेल्या मागणीचे त्यांनी समर्थन केले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसजवळ योग्य असे संख्याबळ असल्याने अधिवेशन बोलावल्यास आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने सरकारचा पराभव होईल, या भीतीपोटी अधिवेशन बोलावले जात नसल्याचे त्यातून सिद्ध होत असल्याचे बर्डे म्हणाले. राज्यात काँग्रेस सत्तेवर असताना घेतलेल्या कर्जाचा आकडा ४ ते ५ हजार कोटी रुपयांपर्यंत होता. पण भाजपा सरकारच्या काळात कर्जाची रक्कम १८ हजार कोटी रुपयांवर गेल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. राज्यात विकासासाठी केंद्राकडून ३० हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच जनतेवर लागू केलेल्या विविध कराच्या रुपातील महसूल सरकारी तिजोरीत जमा होत असतो. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढण्यामागील कारणावर त्यानी साशंकता व्यक्त केली. फॉर्मेलिनच्या प्रश्नावर त्यांनी मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर सुद्धा टिका केली आहे. मासळीची तपासणी करण्याचे काम विदेशी यंत्रणेला देणे चुकीचे असून यावरुन मंत्र्याला आपल्याला अन्न व औषधी प्रशासनावर विश्वास नसल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्यात येणारे पर्यटक मासळी खाण्यासाठी येत असल्याने पर्यटन व्यवसायावर सुद्धा परिणाम होणार असल्याचा दावा त्यांनी केला.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसgoaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर