इंग्रजीचे अनुदान बंद करा!

By Admin | Updated: December 4, 2015 01:28 IST2015-12-04T01:27:58+5:302015-12-04T01:28:25+5:30

मांद्रे : इंग्रजी प्राथमिक शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याची मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या मांद्रे प्रभागाच्या

Close English Grant! | इंग्रजीचे अनुदान बंद करा!

इंग्रजीचे अनुदान बंद करा!

मांद्रे : इंग्रजी प्राथमिक शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याची मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या मांद्रे प्रभागाच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आली. मंचच्या मांद्रे प्रभागाची बैठक नुकतीच देऊळवाडा, मांद्रे येथे श्री हनुमान मंदिरात झाली. या वेळी प्रादेशिक भाषांमधील प्राथमिक शाळांच्या सशक्तीकरणासाठी प्रसंगी तीव्र आंदोलनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मांद्रेचे माजी सरपंच अशोक मांद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत प्रभाग कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आनंद शिरगावकर, राघोबा गावडे, कृष्णा गावडे, मिलिंद केरकर, प्रभाग सचिव तथा केंद्रीय समितीचे सदस्य गजानन मांद्रेकर, केरीचे पंच यशवंत केरकर, प्रचारप्रमुख लक्ष्मण ओटवणेकर, विष्णूबुवा शेटगावकर, दिलीप मेथर, रसिक म्हामल, आत्माजी नाईक, केंद्रीय समितीचे सदस्य वल्लभ केळकर व अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत मांद्रे प्रभाग कार्यकारिणी अधिक व्यापक बनवण्याच्या दृष्टीने महिला, विद्यार्थी, सामाजिक तथा सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, तसेच कलाकार यांची कार्यकारिणीवर निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
येत्या १५ डिसेंबरपर्यंत मांद्रे प्रभागातील केरी, पालये, हरमल, कोरगाव, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, चोपडे, पार्से, तुये या गावांत ग्रामसमित्या स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. येत्या गोवा मुक्तिदिनी संपूर्ण गोव्यात एकोणीसही प्रभागांत भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे धरणे आयोजिले आहे. मांद्रे प्रभागाचे धरणे मधलामाज, मांद्रे येथील भाऊसाहेब बांदोडकर पुतळ््यासमोर सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत आयोजित करण्याचे या बैठक निश्चित करण्यात आले. येत्या २५ डिसेंबर रोजी प्रभागाचा व्यापक मेळावा आयोजित करण्याचे व जानेवारीत माध्यम प्रश्नावर स्थानिक आमदारांची भेट घेण्याचे बैठकीत ठरले. गजानन मांद्रेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. बैठकीचा समारोप करताना अध्यक्ष अशोक मांद्रेकर यांनी हा लढा निर्णायक असल्याने सर्वांनी सर्वशक्तिनिशी या लढ्यात उतरण्याचे आवाहन केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Close English Grant!