मंत्री गावडे आणि सभापती तवडकर यांच्यामधील गैरसमज दूर
By पूजा प्रभूगावकर | Updated: February 5, 2024 15:18 IST2024-02-05T15:18:03+5:302024-02-05T15:18:13+5:30
कला आणि संस्कृती खात्यातील निधी वितरणातील कथित घोटाळ्याचा वाद भाजपने सामंजस्यपणे सोडवला आहे.

मंत्री गावडे आणि सभापती तवडकर यांच्यामधील गैरसमज दूर
पणजीः कला आणि संस्कृती खात्यातील निधी वितरणातील कथित घोटाळ्याचा वाद भाजपने सामंजस्यपणे सोडवला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सोमवारी सकाळी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर या दोघांची बैठक घेतली व त्यांच्यातील वाद संपुष्टात आणला.
आम्ही गावडे आणि तवडकर दोघांची बाजू आम्ही ऐकली. त्या दोघांमधील "गैरसमज" दूर झाला आहे. आता कोणतीही तक्रार उरलेली नाही,” तानावडे यांनी माध्यमांना सांगितले. सभापतींनी कला आणि संस्कृती खात्यातील निधी संबंधीच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री काय ते ठरवतील. पण पक्षाच्या दृष्टीने हा मुद्दा संपला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.