२२ रोजी दहावीचा निकाल
By Admin | Updated: May 18, 2014 00:17 IST2014-05-18T00:16:36+5:302014-05-18T00:17:00+5:30
२२ रोजी दहावीचा निकाल

२२ रोजी दहावीचा निकाल
पणजी : शालांत महामंडळाअंतर्गत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवार, दि २२ मे रोजी सायं. ५.०० वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे शालांत मंडळाचे अध्यक्ष जुझे रिबेलो यांनी सांगितले. २०१३-१४ या वर्षाची इयत्ता दहावीची परीक्षा १ ते १५ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. यंदा एकूण २४ केंद्रांत घेण्यात आलेल्या या परीक्षेला १९,९६५ विद्यार्थी, तर ४५ विशेष विद्यार्थी बसले होते. दरम्यान, निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे़ (विद्यार्थी प्रतिनिधी)