सीसीटीव्हीतही सिनारी बंधू कैद!

By Admin | Updated: December 30, 2015 03:06 IST2015-12-30T03:06:28+5:302015-12-30T03:06:42+5:30

पणजी : डिचोली येथील रतन करोल खूनप्रकरण क्राईम ब्रँचकडे तपासाला दिल्यानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण पुरावा

Cincinnati brother imprisoned! | सीसीटीव्हीतही सिनारी बंधू कैद!

सीसीटीव्हीतही सिनारी बंधू कैद!

पणजी : डिचोली येथील रतन करोल खूनप्रकरण क्राईम ब्रँचकडे तपासाला दिल्यानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण पुरावा सापडला आहे. आमोणे येथील एका पेट्रोल पंपवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये देविदास व दत्तगुरू सिनारी यांच्यासह ज्या कारमधून त्यांनी रतनचे अपहरण केल्याचा संशय आहे, ती स्विफ्ट कार स्पष्टपणे दिसत आहे. मुख्य म्हणजे या घटनेनंतरच रतन हा बेपत्ता झाला होता.
आमोणे येथे ज्या ठिकाणी रतन करोल उसाचा रस काढण्याचा गाडा चालवत होता, त्याच ठिकाणी एक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपवर काही सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यांचे फुटेज क्राईम ब्रँचने मिळविले आहे. पोलीस उपमहासंचालक व्ही. रेंगनाथन यांनी सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी पुरावे जमविण्याचे काम व्यवस्थित पार पाडले आहे. डिचोली पोलिसांचा तपासही समाधानकारक होता आणि क्राईम ब्रँचही योग्य पद्धतीने तपास करत आहे; परंतु एका संशयिताच्या आत्महत्येमुळे हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cincinnati brother imprisoned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.