चर्चिल, वाचासुंदर तुरुंगातून मुक्त
By Admin | Updated: October 13, 2015 02:51 IST2015-10-13T02:51:14+5:302015-10-13T02:51:26+5:30
पणजी : लुईस बर्जर-जैका लाच प्रकरणातील आरोपी माजी मंत्री चर्चिल आलेमाव हे सव्वादोन महिन्यांनंतर, तर ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर हे

चर्चिल, वाचासुंदर तुरुंगातून मुक्त
पणजी : लुईस बर्जर-जैका लाच प्रकरणातील आरोपी माजी मंत्री चर्चिल आलेमाव हे सव्वादोन महिन्यांनंतर, तर ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर हे अडीच महिन्यांच्या तुरुंगवासातून सोमवारी बाहेर आले. पणजी विशेष न्यायालयाने दोघांनाही सशर्त जामीन मंजूर केला. यापूर्वी दोघांचेही तीन जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते.
जैका प्रकरणात अटक करण्यात आलेले चर्चिल यांना जामीन मंजूर करण्याचा निवाडा विशेष न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश भारत देशपांडे यांनी दिला. ५ लाख रुपये अनामत रक्कम, पासपोर्ट न्यायालयात जमा करणे आणि परवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाण्याच्या अटीवर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आनंद वाचासुंदर यांनाही याच शर्तीखाली जामीन मंजूर करण्यात आला.
चर्चिल यांनी यापूर्वी केलेले तीन जामीन अर्ज फेटाळताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांना भोवली. (पान ५ वर)