हायरसेकंडरी बंद करण्याच्या निर्णयावर चौगुले ठाम

By Admin | Updated: May 13, 2014 18:29 IST2014-05-13T18:20:32+5:302014-05-13T18:29:59+5:30

मडगाव : दहावीचा निकाल आठ दिवसांवर आला असताना मडगावचे चौगुले उच्च माध्यमिक विद्यालय यंदा चालू राहिल की नाही, या बद्दलचा संभ्रम अजूनही दूर झालेला नाही.

Chougule firmly decides to close the hierarchy | हायरसेकंडरी बंद करण्याच्या निर्णयावर चौगुले ठाम

हायरसेकंडरी बंद करण्याच्या निर्णयावर चौगुले ठाम

मडगाव : दहावीचा निकाल आठ दिवसांवर आला असताना मडगावचे चौगुले उच्च माध्यमिक विद्यालय यंदा चालू राहिल की नाही, या बद्दलचा संभ्रम अजूनही दूर झालेला नाही. कुठल्याही परिस्थितीत आम्ही यंदा अकरावीच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाहीत, असे चौगुले व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आमच्या निर्णयात कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया चौगुलेचे प्राचार्य रमेश गावकर यांनी व्यक्त केली. चौगुलेबद्दल निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने शिक्षण खात्याला तीन महिन्यांचा अवधी दिला होता. ही मुदत गेल्या सप्टेंबर महिन्यात संपूनही सरकारने अजूनही आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. चौगुले उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान व कला अशा दोन शाखेतील अभ्यासक्रम चालू आहेत. या विद्यालयातून दरवर्षी चारशे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा. तीन वर्षांपूर्वीच चौगुले व्यवस्थापनाने आपला उच्च माध्यमिक विभाग बंद करण्याचे इरादे स्पष्ट केले होते. या संदर्भात शिक्षण खात्याची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, चौगुलेला उच्च माध्यमिक विभाग बंद करण्याची कुठलीही मान्यता देण्यात आलेली नाही, अशी माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे, मुख्यमंत्र्यांनी चौगुले व्यवस्थापनासमोर आणखी एक वर्ष उच्च माध्यमिक विभाग चालू ठेवावा, असा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यानच्या काळात बोर्डा येथे मल्टिपर्पज हायरसेकंडरीच्या आवारात नवीन इमारत बांधून हा विभाग तेथे सामावून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, या प्रस्तावाला अजूनपर्यंत चौगुलेची संमती मिळालेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणात शिष्टाई होण्याचे संकेत दिले जात आहेत. या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा, अशी विनंती शिक्षकांनीही मुख्यमंत्र्यांना केली आहे, अशी माहिती या विद्यालयातील शिक्षक श्रीकांत मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Chougule firmly decides to close the hierarchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.