बालकांत त्वचारोगाची साथ
By Admin | Updated: October 10, 2014 01:38 IST2014-10-10T01:34:38+5:302014-10-10T01:38:35+5:30
पणजी : राज्यात ‘हँड फुट माउथ’ या लहान मुलांना होणाऱ्या संसर्गजन्य त्वचारोगाची साथ पसरली असून सरकारी व खासगी दवाखान्यांत मुलांना घेऊन मोठ्या प्रमाणावर

बालकांत त्वचारोगाची साथ
पणजी : राज्यात ‘हँड फुट माउथ’ या लहान मुलांना होणाऱ्या संसर्गजन्य त्वचारोगाची साथ पसरली असून सरकारी व खासगी दवाखान्यांत मुलांना घेऊन मोठ्या प्रमाणावर पालकांच्या रांगा लागल्या आहेत.
पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को, केपे व काणकोणमध्ये ही साथ पसरल्याची माहिती त्या ठिकाणच्या सरकारी व खासगी दवाखान्यांतून देण्यात आली. मुलांना घेऊन खासगी दवाखान्यांत पालकांच्या रांगा लागत आहेत. पणजीतही ही साथ मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ वीरेंद्र गावकर यांनी दिली. या रोगाची लागण झालेल्या मुलांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातही आणले जात असल्याची माहिती गोमेकॉतील दोन बालरोगतज्ज्ञांकडून देण्यात आली. गोमेकॉतील बालरुग्ण विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. मिनी सिल्वेरा यांना विचारले असता, या रोगाची लागण झालेली मुले ओपीडीत येत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘हँड फुट माउथ’ असे या रोगाचे अॅलोपॅथिक नाव असून आयुर्वेदात हा रोग संक्रामक व्याधीच्या गटात येतो. हा रोग ६ महिन्यांच्या मुलापासून ५ वर्षांच्या मुलांनाही होऊ शकतो. हातापायांवर पुरळ उठतात, पोटावर आणि तोंडावरही पुरळ येतात. त्यामुळे असह्य खाज सुटते. त्याची सुरुवात तोंडापासून होते. तोंडात लहान फोड
येतात. त्यामुळे खाताना त्रास
होतो. (प्रतिनिधी)