मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी!

By Admin | Updated: April 2, 2015 02:09 IST2015-04-02T02:09:19+5:302015-04-02T02:09:19+5:30

पणजी : येथे उपोषणाला बसलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचाऱ्यांवर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत माफी मागावी,

Chief Minister should apologize! | मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी!

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी!

पणजी : येथे उपोषणाला बसलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचाऱ्यांवर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत माफी मागावी, अशी मागणी १०८ रुग्णवाहिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
मंगळवारी उसगाव येथे मुख्यमंत्र्यांना घेराव घातला असताना मुख्यमंत्र्यांनी महिला रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या रंगाबाबत विधान केले होते. मुख्यमंत्री हा आरोप अमान्य करत असले, तरी तेथे सावर्डेचे आमदार गणेश गावकर व पोलीस उपस्थित होते. मुख्यमंत्री आमच्याशी बोलत असताना आम्ही मोबाईलवर रेकॉर्डिंग करून घेत होतो. मात्र, पोलिसांनी रेकॉर्डिंग करू नका, असे म्हणत मोबाईल काढून घेतल्याचे आंदोलनाला बसलेल्या एका रुग्णवाहिका कर्मचाऱ्याने सांगितले.
तुम्ही अशा प्रकारे थेट आंदोलन व उपोषण करून चूक केली. आंदोलन करण्यापूर्वी तुम्ही आमदारांना विश्वासात घ्यायला हवे होते. मला कामगार नेता म्हणून २० वर्षांचा अनुभव आहे. तुमच्या समस्या सोडविणे कठीण गेले नसते, असे आमदार गावकर या वेळी म्हणाले. गावकर यांना कर्मचाऱ्यांनी योग्य शब्दात प्रत्युतर दिले. तुम्ही आमदार एवढे दिवस आमच्या आंदोलन काळात कधीच आम्हाला भेटायला आला नाहीत. आमची समस्या काय आहे, ते तुम्ही जाणूनही घेतले नाही, असे कर्मचाऱ्यांनी गावकर यांना सुनावले.
दरम्यान, लॉयर्स फोरम या वकिलांच्या संघटनेने त्यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांना कोणतीही कायदेशीर मदत हवी असल्यास
आम्ही मोफत सहकार्य देण्यास तयार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संघटनेचे सदस्य अ‍ॅड. ई. डायस म्हणाले, राज्य सरकार जीव्हीके ईएमआरआय व्यवस्थापनाला रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी वार्षिक ३ ते ५ कोटी रुपये देते.
मात्र, एक बाहेरील कंपनी बेकायदेशीरपणे सेवा देत आहे,
ही बाब सरकारसमोर उघड झाली असली, तरी आम्ही कंपनी रजिस्ट्रर करणार नाही, असे सरकारला व्यवस्थापन सांगते आणि राज्य सरकार यावर काहीच कारवाई करत नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे.
गोमंतकीय युवकांना रस्त्यावर आणणाऱ्या कंपनीच्या मागे सरकारचे पाठबळ आहे, असा आरोपही डायस यांनी केला. कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अ‍ॅड. अर्जुन नाईक,
अ‍ॅड. स्नेहा शेटये, अ‍ॅड. रघू शेटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister should apologize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.