शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गोव्यात पर्यटकांचे हाल पण मुख्यमंत्री म्हणाले टॅक्सींना स्पीड गवर्नर लावावेच लागतील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 19:30 IST

गोव्यात पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांचा संप सुरू असला तरी, स्पीड गवर्नर लागू करण्यापासून टॅक्सींना वगळावे ही टॅक्सी व्यवसायिकांची मागणी कायद्यानुसार मान्य करता येत नाही.

पणजी - गोव्यात पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांचा संप सुरू असला तरी, स्पीड गवर्नर लागू करण्यापासून टॅक्सींना वगळावे ही टॅक्सी व्यवसायिकांची मागणी कायद्यानुसार मान्य करता येत नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी येथे जाहीर केले. टॅक्सींना स्पीड गवर्नर बसविणे हे केंद्र सरकारच्या कायद्यानुसार गरजेचे असल्याने आपण त्याविषयी काही करू शकत नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. पर्यटक टॅक्सी व्यवसायिक शुक्रवारपासून संपावर गेले आहेत. आज रविवारीही त्यांनी संप सुरू ठेवण्याचे ठरवले आहे. स्पीड गवर्नरला टॅक्सी व्यवसायिकांचा विरोध आहे. स्पीड गवर्नरमुळे टॅक्सी व्यवसायिकांना प्रति किलोमीटर ताशी साठपेक्षा जास्त गतीने वाहन हाकताच येणार नाही असे टॅक्सी व्यवसायिकांचे म्हणणो आहे. सरकारने कदंब वाहतूक महामंडळ आणि गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे बसगाडय़ांची व खासगी कारगाडय़ांची व्यवस्था पर्यटकांच्या वाहतुकीसाठी केली आहे पण ती पुरेशी नाही. शनिवारीही पणजीतील आझाद मैदानावर हजारो टॅक्सी व्यवसायिक जमले व त्यांनी सरकारचा निषेध केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणो ऐकून घेतले. मुख्यमंत्री र्पीकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले, की टॅक्सी व्यवसायिकांनी संपावर जाण्यापूर्वी त्यांच्या मागण्यांचे निवेदनच सरकारला सादर केले नाही. अजुनही त्यांनी निवेदन दिले नसल्याने अधिकृतरित्या त्यांची मागणी आम्हाला ठाऊक नाही पण स्पीड गवर्नरला त्यांचा आक्षेप असल्याचे कळते. स्पीड गवर्नर हा सहा महिन्यांपूर्वीच वाहनांना लागू झाला होता. आम्ही स्पीड गर्वनर खरेदी करण्यासाठी टॅक्सी व्यवसायिकांना सहा महिन्यांची मुदत दिली होती. केंद्र सरकारने हा कायदा लागू केला आहे. प्रत्येक राज्याने तो स्वीकारला आहे. गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांचाच त्यास कशाला आक्षेप ते मला कळत नाही. स्पीड गवर्नर जर टॅक्सींना लावला नाही तर येत्या दि. 24 फेब्रुवारीनंतर टॅक्सी निरुपयोगी ठरतील. त्याना कुठलाच आरटीओ फिटनेस प्रमाणपत्र देणार नाही.काँग्रेसची आज पर्रीकरांशी चर्चा दरम्यान, टॅक्सी व्यवसायिकांची मागणी सरकारसमोर मांडण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक व अन्य काँग्रेस नेते आज रविवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी भेटीची वेळ मागितली होती. दुपारी बारा वाजता मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिली आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने सगळी व्यवस्था केली असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणो आहे. सरकारी कंत्रटावर ज्या टॅक्सी आहेत व ज्या गेल्या शुक्रवारी रुजू झाल्या नाहीत त्यांचे कंत्रट रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा