बिस्मार्कच्या खुनाची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली
By Admin | Updated: November 14, 2015 01:52 IST2015-11-14T01:51:08+5:302015-11-14T01:52:10+5:30
पणजी : सांतइस्तेव्ह येथील फादर बिस्मार्क डायस यांच्या खुनाची शक्यता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पोलिसांच्या प्रथमदर्शनी अहवालाच्या आधारे शुक्रवारी

बिस्मार्कच्या खुनाची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली
पणजी : सांतइस्तेव्ह येथील फादर बिस्मार्क डायस यांच्या खुनाची शक्यता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पोलिसांच्या प्रथमदर्शनी अहवालाच्या आधारे शुक्रवारी फेटाळून लावली
आहे.
मिरामार येथे रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. त्या वेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना बिस्मार्क डायस यांच्या मृत्यूविषयी विचारले असता, ते म्हणाले की डायस यांच्या मृत्यूबाबत प्रसार माध्यमांमध्ये खूप काही छापून येत आहे. डायस यांचा मृत्यू झाला त्या वेळी पहिले दोन-तीन दिवस मलाही खूप चिंता वाटली होती. त्यात काही काळंबेरं असावं, असे वाटले होते. डायस हे सामाजिक कार्यकर्ते असल्याने मी स्वत:हून त्यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेण्यास पोलिसांना सांगितले. मी पोलिसांकडून प्राथमिक अहवाल मागितला. तो अहवाल वाचल्यानंतर मला बरेच काही कळून आले.
मुख्यमंत्री म्हणाले, की फादर डायस यांच्या भावाशी मी बोललो आहे. फादर डायस यांचा खून झाला असावा, असे प्रसार माध्यमांमध्ये छापून येते; पण पोलिसांच्या प्राथमिक अहवालात तरी तसे काही आढळत नाही. डायस यांचा बुडून मृत्यू झाल्याचे अहवाल स्पष्ट करतो. एवढेच नव्हे तर फादर डायस हे त्या दिवशी मृत्यूपूर्वी कुठे होते व त्यांचा दिनक्रम कसा होता याविषयीची सविस्तर माहिती पोलिसांच्या प्राथमिक अहवालामध्ये आहे. त्यामुळे खून झाला असावा, असे प्रथमदर्शनी म्हणता येत नाही. क्राईम ब्रँचकडून चौकशी करून घ्या, अशी मागणी माझ्याकडे तरी कुणी केलेली नाही.
(खास प्रतिनिधी)