मुख्यमंत्री पार्सेकर यांचा आज सत्कार
By Admin | Updated: July 5, 2016 02:12 IST2016-07-05T02:12:50+5:302016-07-05T02:12:50+5:30
पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी वयाची साठ वर्षे पूर्ण केली. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्रवासाचा व विविध

मुख्यमंत्री पार्सेकर यांचा आज सत्कार
पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी वयाची साठ वर्षे पूर्ण केली. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्रवासाचा व विविध क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या हेतूने आज, मंगळवारी ताळगाव येथील कम्युनिटी सभागृहात सायंकाळी पाच वाजता नागरी सत्कार आयोजिला आहे.
या सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे या नात्याने येणे अपेक्षित होते. तथापि, आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने गडकरी उपस्थित राहू शकणार नाहीत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री व भाजपचे आमदार सत्कार सोहळ्यास उपस्थित राहतील. पार्सेकर यांच्या सत्कारासाठी पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठी समिती नियुक्त केली आहे. १९८९ मध्ये पार्सेकर यांनी भाजपचे काम सुरू केले होते. आमदार, मंत्री व मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. पार्सेकर यांचा वाढदिवस सोमवारी त्यांच्या मांद्रे मतदारसंघात साजरा करण्यात आला. सर्व मंत्री तसेच विविध पक्षांच्या आमदारांनी व भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या. (खास प्रतिनिधी)