‘चेन्नईयन’च्या खेळाडूस अटक
By Admin | Updated: December 21, 2015 02:01 IST2015-12-21T02:01:03+5:302015-12-21T02:01:52+5:30
चेन्नईयन एफसीने गोव्याचा पराभव करीत आयएसएलचा चषक पटकविला खरा; पण सामन्यानंतर जो ‘सामना’ रंगला ते

‘चेन्नईयन’च्या खेळाडूस अटक
चेन्नईयन एफसीने गोव्याचा पराभव करीत आयएसएलचा चषक पटकविला खरा; पण सामन्यानंतर जो ‘सामना’ रंगला ते मात्र धक्कादायक होते. एफसी गोवाचे सहमालक दत्तराज साळगावकर यांना मैदानावरच धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून चेन्नईयन एफसीचा खेळाडू इलानो ब्लूमर (ब्राझील) याला रविवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान अटक करण्यात आली. दत्तराज साळगावकर यांनी मडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मडगाव पोलीस ठाणे परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव होता.
या घटनेचा निषेध म्हणून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बक्षीस वितरण समारंभास उपस्थित न राहता, आल्या पावली परतणे पसंत केले. एफसी गोवाच्या संपूर्ण संघाने बक्षीस वितरण समारंभावर बहिष्कार टाकला.