शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

सीमांवरच वाहनांची कागदपत्रे तपासणार, मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:06 IST

नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक डिसेंबर अखेरीस गोव्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पणजी - गोव्यात येणाऱ्या वाहनांची कागदपत्रे राज्याच्या सीमांवरच एकदा तपासायची व पुन्हा पुन्हा शहरांमध्ये ही वाहने थांबवून कागदपत्रे तपासायची नाहीत अशा पद्धतीचे धोरण सरकार आखत आहे. यापुढील काळात हे धोरण अंमलात येईल. नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक डिसेंबर अखेरीस गोव्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनीही बैठकीत भाग घेतला. मंत्रलयात झालेल्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांवरील अपघातप्रवण क्षेत्रंकडे लक्ष द्यावे अशी सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केली. नाताळ व नववर्षाच्या कालावधीत अपघात घडू नये तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ब्लॅक स्पॉट्स तथा अपघातप्रवण क्षेत्रंच्या ठिकाणी लक्ष असावे असे त्यांनी सूचविले. जिथे जास्त वाहतूक कोंडी होते, अशा ठिकाणी ज्यादा वाहतूक पोलिस नेमले जावेत. त्यासाठी वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला जावा, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिस खात्याला केली.आवश्यक त्या सगळ्या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलिस ठेवले जावेत. सुरक्षेच्या कारणावरून लोकांशी बोलताना पोलिसांनी तसेच वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांशी संवाद साधताना सौजन्याने व नम्रपणो वागावे अशीही अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत व्यक्त केली. पर्यटकांना अकारण त्रस होईल, त्यांचा छळ होईल अशा प्रकारे पोलिसांनी वागू नये. कारण लाखो देश- विदेशी पर्यटक या काळात गोव्यात असतात. त्यांनी परत जाताना गोव्याविषयी मनात चांगली प्रतिमाच घेऊन जायला हवी असे सरकारला वाटते.उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही बैठकीत भाग घेतला. गोव्यात आता परप्रांतांमधून येणारी वाहने सर्व ठिकाणी थांबवून त्यांची कागदपत्रे तपासली जातात. नव्या वर्षी सरकार नवे धोरण तयार करील, ज्याद्वारे पोलिसांनी केवळ सीमेवर एकदाच वाहनांची तपासणी करावी असे अपेक्षित असेल. दरम्यान, या बैठकीनंतर दुपारी मुख्यमंत्री सावंत दिल्लीस रवाना झाले. दिल्ली भेटीत ते केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटून म्हादई पाणीप्रश्नी चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचीही मुख्यमंत्री भेट घेतील.

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षाPramod Sawantप्रमोद सावंत