चर्चिलसह इतरांवर १२ रोजी होणार आरोप निश्चिती

By Admin | Updated: October 4, 2015 02:26 IST2015-10-04T02:25:57+5:302015-10-04T02:26:24+5:30

पणजी : लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणात माजी मंत्री चर्चिल आलेमाव व ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्यासह इतरांवर १२ आॅक्टोबर रोजी आरोप

Chargal and others will be confirmed on 12th | चर्चिलसह इतरांवर १२ रोजी होणार आरोप निश्चिती

चर्चिलसह इतरांवर १२ रोजी होणार आरोप निश्चिती

पणजी : लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणात माजी मंत्री चर्चिल आलेमाव व ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्यासह इतरांवर १२ आॅक्टोबर रोजी आरोप निश्चित केले जाणार आहेत. क्राईम ब्रँचच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली. या प्रकरणी २१ सप्टेंबर रोजी पणजी विशेष न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात आले होते.
दरम्यान, चर्चिल व वाचासुंदर यांच्या जामीन अर्जांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. पणजी येथील विशेष न्यायालयात शनिवारी आनंद वाचासुंदर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. पोलिसांनी आक्षेप सादर केल्यामुळे पुढील मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. चर्चिल आलेमाव यांचीही सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली आहे. चर्चिल आलेमाव यांच्या वकिलाने, पोलिसांकडे मागितलेली कागदपत्रे मिळाली नाहीत म्हणून न्यायालयात नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Chargal and others will be confirmed on 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.