जीसीए निवडणूक समिती अध्यक्षांची गच्छंती
By Admin | Updated: June 21, 2015 02:34 IST2015-06-21T02:34:13+5:302015-06-21T02:34:27+5:30
पर्वरी : जीसीएच्या सचिवपदी चेतन देसाई यांची फेरनियुक्ती केल्यानंतर चोवीस तासांच्या आत आपलाच निर्णय फिरविणारे विद्यमान अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांच्यावर

जीसीए निवडणूक समिती अध्यक्षांची गच्छंती
पर्वरी : जीसीएच्या सचिवपदी चेतन देसाई यांची फेरनियुक्ती केल्यानंतर चोवीस तासांच्या आत आपलाच निर्णय फिरविणारे विद्यमान अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांच्यावर शनिवारी आणखी एक नामुष्की आली. जीसीएच्या निवडणुकीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष एन. डी. अगरवाल यांना निवडणूक प्रक्रियेतून दिवाणी न्यायालयाने बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
दि. २२ रोजी निवडणुकीसंदर्भात न्यायालयात पुनर्निर्णय येणार असल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत बदल घडण्याची शक्यता आहे. न्यायालयाने डॉ. साळकर आणि चेतन देसाई यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दि. २० रोजी बैठक घेण्यास सांगितले होते. शनिवार, दि. २० रोजी दुपारी ३ वाजता जीसीए कार्यालयात बोलविलेल्या मासिक बैठकीत बहुमत सिद्ध करणे हा एकच मुख्य विषय ठरला होता. या वेळी विनोद फडके, चेतन देसाई, मनोहर नाईक, अकबर मुल्ला, देश किनळेकर, सूरज लोटलीकर आणि मोहन चोडणकर तसेच एकूण ८५ फडके-देसाई क्लबांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला डॉ. साळकर आणि त्यांचे समर्थक पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. या वेळी कामकाजासाठी उच्च न्यायालयाचे वकील (निरीक्षक) अॅड. जॉन लोबो हे उपस्थित होते. (पान २ वर)