केंद्राकडून ५०० कोटी मिळतील!
By Admin | Updated: November 25, 2014 01:25 IST2014-11-25T01:21:54+5:302014-11-25T01:25:08+5:30
पणजी : मी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर माझ्या कामाचा व्याप वाढला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ कामातच जातो. लोकांच्या अपेक्षाही प्रचंड आहेत. मात्र, मी कामाचा ताण घेत नाही.

केंद्राकडून ५०० कोटी मिळतील!
पणजी : मी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर माझ्या कामाचा व्याप वाढला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ कामातच जातो. लोकांच्या अपेक्षाही प्रचंड आहेत. मात्र, मी कामाचा ताण घेत नाही. मी टेन्शन न घेता काम करतोय, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून आपण पाचशे कोटी रुपयांचे पॅकेज गोव्यासाठी मागितले आहे व ते मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे,
ॅ तुम्ही मुख्यमंत्री बनल्यानंतर आता तुम्हाला प्रशासनाबाबत काय अनुभव येत आहे?
- प्रशासनात काही अधिकारी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. विशेषत: मोदी सरकारने आम्हाला जे नवे आयएएस अधिकारी दिले आहेत, ते बऱ्यापैकी कष्टाळू आहेत. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन यांच्यासह सगळे नवे आयएएस अधिकारी नीटनेटक्या पद्धतीने काम करतात. अधिकाऱ्यांना विषय सांगितला की ते व्यवस्थित मार्गी लावतात. त्यामुळे प्रशासनाबाबत मला समस्या दिसत नाही. मला प्रशासन कसे चालवायला जमेल, असा प्रश्न प्रारंभी पडला होता; पण आता मी त्याबाबत निश्चिंत झालो आहे. बऱ्यापैकी काम होत आहे.
ॅ तुम्ही दिवसाला किती तास काम करता? कौटुंबिक जीवनावर त्याचा काय परिणाम होतो?
- मी सकाळी सहा वाजता उठतो. माझे प्रत्यक्ष काम सात वाजता सुरू होते. एखाद्यावेळी बाहेर कार्यक्रम ठरलेला असतो, त्या वेळी सकाळी सचिवालयात जाता येत नाही. अन्यथा मी सकाळी नऊ वाजता सचिवालयात पोहोचतो. सोमवारी मी संजीवनी कारखान्याच्या कार्यक्रमास गेलो. तिथे जाण्यापूर्वी मी घरीच सकाळी सात वाजल्यापासून फाईल्स वाचून हातावेगळ्या केल्या. दुपारी जेवल्यानंतरही माझे काम लगेच सुरू होते. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत काम चालू असते. मी बाहेर जेवत नाही. घरीच जेवत असल्याने कुटुंबाशी माझा रोजचा कनेक्ट राहतो. मी कुटुंबवत्सल असल्याने काम सांभाळूनही मी कुटुंबाशी जोडलेला राहतो.
ॅ केंद्राकडे तुम्ही अधिकृतरीत्या आर्थिक पॅकेज मागितलेय काय?
- मी स्वत: केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांच्याकडे ‘डीओ’ लेटर दिले आहे. गोव्यासाठी पाचशे कोटी रुपयांचे पॅकेज मागितले आहे. ते मिळेल. तथापि, राज्याचा महसूल आतादेखील वाढत आहे.
(पान ७ वर)