कॅसिनो, काही हॉटेल्स वेश्या व्यवसायाचे अड्डे
By Admin | Updated: September 22, 2014 01:58 IST2014-09-22T01:36:15+5:302014-09-22T01:58:33+5:30
पोलीस छाप्यातील माहिती : संशयिताकडे सापडले क्रमांक

कॅसिनो, काही हॉटेल्स वेश्या व्यवसायाचे अड्डे
पणजी : जुगार कायदेशीर केल्यावर त्याला कॅसिनो नाव देण्यात आले. आता कॅसिनो हे वेश्या व्यवसायाचे अड्डे बनल्याचे शनिवारी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून उघड झाले आहे.
शनिवारी गुन्हा अन्वेषण विभागाने पर्वरी येथे टाकलेल्या छाप्यातून अनेक गोष्टी उघड झाल्या अहेत. संशयित रॉबिन ऊर्फ रुबीकुमार (२८) याच्याकडे सापडलेल्या फोन क्रमांकांच्या यादीमुळे पर्दाफाश झाला आहे. त्यात कॅसिनोंच्या पदाधिकाऱ्यांचे फोन क्रमांक आहेत. तसेच वास्को आणि पणजी शहरातील काही बड्या हॉटेलवाल्यांचेही क्रमांक आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॉबिन हा गोव्यात कुणाकुणाशी संपर्क ठेवून होता याची माहिती पोलिसांनी नेटवर्क कंपन्यांकडून मागविली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याची माहिती अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली.