हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे कॅसिनो कनेक्शन

By Admin | Updated: September 21, 2014 02:12 IST2014-09-21T02:09:05+5:302014-09-21T02:12:41+5:30

कोलकात्यातील युवतीची सुटका : दिल्लीतील संशयिताला क्राईम ब्रँचकडून अटक

Casino connection to the Hyprophilic prostitution business | हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे कॅसिनो कनेक्शन

हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे कॅसिनो कनेक्शन

मडगाव : गोव्यातील उच्चभ्रू वर्तुळात चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा थेट कॅसिनो डिलर्सशी संबंध असल्याचे स्पष्ट करणारे एक प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणले आहे. डिलर्सना हाताशी धरून कॅसिनोवर खेळायला येणाऱ्या पर्यटकांना हायप्रोफाईल वेश्या पुरविण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी नवी दिल्लीतील रॉबिन ऊर्फ रुबीकुमार या २८ वर्षीय युवकाला अटक केली असून कोलकात्यातील एका युवतीची सुटका केली आहे.
रघुवीरनगर-नवी दिल्ली येथील हा संशयित पर्वरीतील एका हॉटेलात राहून आपला व्यवसाय करत होता, हे उघडकीस आले आहे. कॅसिनोतील ग्राहकांना पुरविण्यासाठी या युवतीला खास विमानाने गोव्यात बोलावून घेतले होते, हेही आता उघड झाले आहे. या प्रकरणात अटक केलेल्या संशयिताला न्यायालयात हजर केले असता, बारा दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी ही धाडसी कारवाई केली.
शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अटक केलेल्या संशयिताच्या मोबाईलवर बऱ्याच मोठ्या हस्तींची नावे सापडली आहेत. त्यात काही कॅसिनो डिलर्सचाही समावेश आहे. दिल्लीत बसूनच हा सौदा केला जायचा व नंतर गोव्यात या युवतींना आणून त्यांना कॅसिनो ग्राहकांना पुरविले जायचे. या प्रकरणात काही स्थानिक डिलर्सचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीचा हा संशयित कोलकात्यातून युवतीला आणणार, याची माहिती क्राईम ब्रँचच्या हाती लागल्यावर पोलीस शिपाई गौरिश नाईक व चंद्रशेखर पेडणेकर यांच्या मदतीने पर्वरी येथे सापळा रचला होता. या युवतीला वास्को विमानतळावर उतरून घेऊन तिला पर्वरीला आणण्याचे ठरविले होते. हे कारस्थान उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी एक बनावट गिऱ्हाईकही तयार केले होते. या बनावट गिऱ्हाईकाने रॉबिन याच्याशी संपर्क साधून हा सौदा ठरविला होता. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संशयित या युवतीला घेऊन पर्वरी
येथील एका हॉटेलात आपल्या आलिशान कारमधून आला होता. पोलिसांनी ही गाडीही
जप्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Casino connection to the Hyprophilic prostitution business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.