बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आले अन् हरमलच्या समुद्रात दोघे बंधू बुडाले
By किशोर कुबल | Updated: October 18, 2023 14:01 IST2023-10-18T14:00:12+5:302023-10-18T14:01:16+5:30
...परंतु बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने घाला घातला.

बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आले अन् हरमलच्या समुद्रात दोघे बंधू बुडाले
पणजी : हरमल समुद्र किनाऱ्यावर जम्मू काश्मीरच्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. यांपैकी एकाचे लग्न ठरले होते व बॅचलर पार्टीसाठी ते गोव्यात आले होते. परंतु बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने घाला घातला.
आज सकाळी ८.४० च्या सुमारास ही दुर्घटना घडली अमनदीप भौ (२८) व अभिषेक भौ (३४) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही सख्खे भाऊ आहेत. जम्मू काश्मिर व हिमाचाल प्रदेशमधून चौघेजण गोव्यात आले होते. अभिषेक याचे लग्न ठरल्याने बॅचलर पार्टीसाठी ते आले होते. हरमल येथील स्वीट लेक या प्रसिध्द तलावाजवळच ते समुद्रात उतरले होते.
अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी दोन्ही प्रेते वर काढण्यात यश मिळवले. या दुर्घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.