कळंगुट पोलिसांकडून ६ लाख किमतीचा गांजा जप्त; छाप्यात एकाला अटक
By काशिराम म्हांबरे | Updated: October 16, 2023 15:14 IST2023-10-16T15:12:35+5:302023-10-16T15:14:14+5:30
निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोमवारी सकाळी ही करवाई करण्यात आली.

कळंगुट पोलिसांकडून ६ लाख किमतीचा गांजा जप्त; छाप्यात एकाला अटक
म्हापसा - कळंगुट पोलिसांनी नायकावाडो येथील डॉल्फीन सर्कल नजीक अंमली पदार्थाच्या छाप्यात केलेल्या कारवाईत एकाला अटक केली आहे. या छाप्यात अटक करण्यात आलेल्या एन व्ही कृष्णा रेड्डी (वय २७, आंद्र प्रदेश) या संशयितानेअवैधरित्या बाळगलेला ६ किलो १०० ग्राम वजनाचा तसेच ६ लाख १० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोमवारी सकाळी ही करवाई करण्यात आली. संशयित ग्राहकाला वितरीत करण्यासाठी अंमली पदार्थघेऊन येणार असल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी उपनिरीक्षक विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने सापळा रचण्यात आला होता. रचलेल्या सापळ्यातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याला अटक करुन त्याच्या विरोधात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्याच्याजवळ सापडलेल्या अमंली पदार्था मागील स्त्रोत शोधण्यास पोलिसांनी आरंभले आहे. पुढील तयाप कार्य सुरु करण्यात आलेआहे.