क्रिकेट स्पर्धेवरील जुगारावर कळंगुट पोलिसांचा छापा
By काशिराम म्हांबरे | Updated: October 20, 2023 15:49 IST2023-10-20T15:49:08+5:302023-10-20T15:49:32+5:30
केलेल्या कारवाईत पोलिसांनी जुगारासाठी वापरलेले ८ मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर साहित्य मिळून सुमारे दिड लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या

क्रिकेट स्पर्धेवरील जुगारावर कळंगुट पोलिसांचा छापा
म्हापसा - सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसी जागतीक क्रिकेट स्पर्धेवर सुरु असलेल्या जुगारावर कळंगुट पोलिसांनी छापा मारून पर्दाफाश केला आहे. गौरावाडा- कळंगुट येथील एका इमारतीत हा प्रकार सुरु होता. केलेल्या कारवाईत दोघा संशयितांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यातआलेल्या संशयितात प्रजेश रामचंद्र ( वय ३६ ,
उडपी- कर्नाटक ) तसेच सुमान हर्षित ( वय २६ कर्नाटक ) यांचा समावेश आहे. निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी संपन्न झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश दरम्यान सुरु असलेल्या सामन्या दरम्यान गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. केलेल्या कारवाईत पोलिसांनी जुगारासाठी वापरलेले ८ मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर साहित्य मिळून सुमारे दिड लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. पुढील तपास कार्य उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर यांच्याकडून सुरु करण्यात आलेआहे.