जीएसटी कौन्सिलकडून मंत्रिगटाची पुनर्रचना; मॉविन यांना पुन्हा स्थान, दुसऱ्या क्रमांकावर बढती
By किशोर कुबल | Updated: December 7, 2023 15:41 IST2023-12-07T15:41:01+5:302023-12-07T15:41:43+5:30
GST Council News: जीएसटी कौन्सिलने दर ठरवण्यासाठी मंत्रीगटाची पुनर्रचना केली असून गोव्याचे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांना पुन्हा स्थान देताना दुसऱ्या क्रमांकावर बढती दिलेली आहे.

जीएसटी कौन्सिलकडून मंत्रिगटाची पुनर्रचना; मॉविन यांना पुन्हा स्थान, दुसऱ्या क्रमांकावर बढती
- किशोर कुबल
पणजी - जीएसटी कौन्सिलने दर ठरवण्यासाठी मंत्रीगटाची पुनर्रचना केली असून गोव्याचे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांना पुन्हा स्थान देताना दुसऱ्या क्रमांकावर बढती दिलेली आहे.
मंत्रीगटात असताना मॉविन यांनी गोव्याशी संबंधित अनेक प्रश्न मांडलेले आहेत. कॅसिनोंना लागू केलेला २८ टक्के कर कमी करावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करून केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेही हा विषय मांडला होता.
नव्या मंत्री गटात निमंत्रकपदी उत्तर प्रदेशचे वित्तमंत्री सुरेश कुमार खन्ना यांची नियुक्ती केली आहे. या गटात अन्य सहा जण सदस्य आहेत त्यात मॉविन, बिहारचे वित्तमंत्री विजयकुमार चौधरी, राजस्थानचे नगर विकास मंत्री शांतीकुमार धारीवाल, पश्चिम बंगालच्या वित्तमंत्री श्रीमती चंद्रिमा भट्टाचार्य, कर्नाटकचे महसूलमंत्री कृष्णा बायरेगौडा व केरळचे वित्तमंत्री के. एन. बालगोपाल यांचा समावेश आहे.