शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
2
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
3
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
4
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
5
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
6
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
7
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
8
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
9
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
10
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
11
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
12
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
13
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
14
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
15
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
16
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
17
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
18
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
19
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
20
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

म्हापशात व्यापारी एकवटले

By admin | Published: February 25, 2017 1:54 AM

बार्देस : म्हापसा नगरपालिकेचे बाजारावर नियंत्रण नसून फेरी विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. ग्राहक व स्थानिक व्यापाऱ्यांना याचा

बार्देस : म्हापसा नगरपालिकेचे बाजारावर नियंत्रण नसून फेरी विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. ग्राहक व स्थानिक व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास होतो. बाजारातील सोपो कर वसुलीत मोठा घोटाळा दडलेला आहे. या अनागोंदीविरोधात म्हापसा व्यापारी संघटना येत्या सोमवारी, दि. २७ रोजी सकाळी १0 वाजता म्हापसा पालिकेवर मोर्चा नेणार असल्याचा इशारा शुक्रवारी देण्यात आला.म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पालिकेच्या आशीर्वादाने सोपो कर गोळा करणाऱ्या व्यक्तीने मार्केटमधील मोकळ्या जागांवर बिगर गोमंतकीय व्यापाऱ्यांचा भरणा केल्याने बाजारात दुकानदारांपेक्षा फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हे लोक रस्ता अडवून बसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना आपला मालसुद्धा दुकानात नेणे कठीण होते. पालिकेने पार्किंग व्यवस्थेचे आश्वासन देऊनही त्याला हरताळ फासला. पालिकेच्या या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी सोमवारी व्यापारी संघटनेचे शिष्टमंडळ पालिकेवर मोर्चा नेणार आहे, असे शिरोडकर म्हणाले.बिगर गोमंतकीयांच्या वाढत्या प्रस्थामुळे अनेक गोमंतकीयांनी आपली दुकाने त्यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. याला सर्वस्वी पालिकाच जबाबदार आहे. पालिका नेहमीच व्यापाऱ्यांवर आरोप करून व्यापाऱ्यांनीच बिगर गोमंतकीयांना आश्रय दिल्याचे सांगते. शिरोडकर म्हणाले की, फेरीवाल्यांनी सोपो करानुसार रोज आपला माल परत न्यायचा असतो व दुसऱ्या दिवशी जागा मिळेल तिथे बसायचे असते; पण आता फेरीवाले शिल्लक माल तेथेच बंदोबस्तात ठेवून घरी जातात. दुसऱ्या दिवशी आपले दुकान खोलल्याप्रमाणे तेथेच ठाण मांडून बसतात. त्यांना कुणी विचारत नाही. चौकशी केली असता असे समजते की, त्यांनी ती जागा कोणाकडून तरी रोख पैसे देऊन विकत घेतलेली असते. बाजारातील अनेक रिकाम्या जागा पुन्हा कशा भरल्या, याची चौकशी पालिका मंडळाने करायला हवी.म्हापशाचे नगराध्यक्ष संदीप फळारी किंवा इतर नगरसेवक म्हापसा बाजारात अधिकृतरीत्या फिरून पाहणी करत नाहीत. त्यामुळे बाजारातील घडामोडी आणि दुर्दशा त्यांना दिसत नाहीत. वातानुकूलित चेंबरमध्ये बसून जे कानावर येते, त्यावर ते विश्वास ठेवतात. बाजारातील गटारातून सांडपाणी वाहते. अनेक ठिकाणी गटारे उघडी असल्यामुळे दुर्गंधी पसरते. याची जाणीव त्यांना नसावी, असेही शिरोडकर म्हणाले.म्हापसा बाजारात फेरीवाले, मसालेवाले व इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची अन्न आणि औषध खाते तपासणी करत नाही. मात्र, एफडीएचे कर्मचारी हॉटेलवाल्यांना येऊन सतावतात. मसाले विकणाऱ्यांच्या तराजूंची तपासणी केली जात नाही. व्यापाऱ्यांची नाहक सतावणूक होते, असे शिरोडकर यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला व्यापारी संघटनेचे सचिव आशिष कार्दोज, सदस्य श्रीपाद सावंत, अमर कवळेकर, नरेश तिवरेकर, श्रीपाद येंडे, गीतेश डांगी, महमंद मोतीवाला, नागेश मयेकर, अभिजित शिंदे, राजन पेडणेकर, रमेश गावस, पांडुरंग सावंत, सुधाकर गौडा व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)