व्यावसायिक शिक्षण महागले!
By Admin | Updated: October 13, 2015 02:54 IST2015-10-13T02:53:55+5:302015-10-13T02:54:08+5:30
पणजी : अभियांत्रिकी, फार्मसी तसेच व्यवस्थापन शिक्षण दहा ते पंधरा टक्क्यांनी महागले असून २0१५-१६ शैक्षणिक वर्षापासून पुढील चार वर्षांकरिता

व्यावसायिक शिक्षण महागले!
पणजी : अभियांत्रिकी, फार्मसी तसेच व्यवस्थापन शिक्षण दहा ते पंधरा टक्क्यांनी महागले असून २0१५-१६ शैक्षणिक वर्षापासून पुढील चार वर्षांकरिता नवे शुल्क अधिसूचित करण्यात आले आहे. निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. लवंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार खासगी, विनाअनुदानित व्यावसायिक संस्थांसाठी नवी फी लागू झाली आहे.
तांत्रिकी शिक्षण उपसंचालक प्रदीप कुस्नूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी वरील समितीच्या शिफारशीनुसार शुल्क फेररचना केली जाते. शैक्षणिक क्षेत्रातही पायाभूत खर्च वाढत असतो. तो विचारात घेऊन शुल्क फेररचना केली जाते. चालू शैक्षणिक वर्षात ज्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांची अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच चार वर्षांच्या कालावधीसाठी फी निश्चित झाली आहे. दरवर्षी साधारणपणे पंधरा टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ होते, असेही त्यांनी सांगितले.
वेर्णा येथील पाद्रे कोसेसांव अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रति सेमिस्टर ट्युशन फी
४५ हजार रुपये, दुसऱ्या वर्षासाठी ४९ हजार रुपये,
तृतीय वर्षासाठी ५३ हजार रुपये व चौथ्या वर्षासाठी ५७ हजार रुपये निश्चित झाली आहे. प्रत्येक वर्षाला प्रति सेमिस्टर
५ हजार रुपये विकास शुल्क व १ हजार ४५0 रुपये
संस्था शुल्क आकारले जाईल. (पान २ वर)