शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विद्यापीठात विद्यार्थ्यांची दादागिरी; शिक्षकाला धमकविण्याचा प्रकार

By समीर नाईक | Updated: September 11, 2023 17:26 IST

दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची शिक्षक संघटनेची मागणी

समीर नाईक, पणजी: गोवा विद्यापीठात निवडणुकीच्या नावाखाली एका विद्यार्थ्याची वारंवार दादागिरी सुरू आहे, यापूर्वी फक्त विरोधी विद्यार्थ्यांना धमकविण्यात येत होते, परंतु आता शिक्षकांना देखील धमकाविण्यात येत आहे, यातून शिक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, दादागिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोवा विद्यापीठ शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आली.

गोवा विद्यापीठ शिक्षक संघटनेतर्फे सोमवारी विद्यापीठाच्या परीसरात जमून या घटनेचा निषेध केला. प्रा. रामराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी एकत्रित येऊन, त्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. 

विद्यापीठाच्या निवडणुका ऑगस्ट मध्ये होणार होत्या, यादरम्यान शिशिर परब या विद्यार्थ्याने विद्यार्थी कल्याण संचालक प्रा. अँथनी विएगस यांना त्यांच्या केबिन बाहेर थांबून हातात काठी घेऊन धमकावले होते, तसेच त्यांची गाडी शिशिर आणि त्यांच्या दोन साथीदाराने अडविली होती. त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. नंतर ही निवडणुका रद्द करून पुढे ढकलण्यात आली होती. याबाबत आम्हाला कळताच आम्ही कुलगुरू व रजिस्ट्रार यांना कळवीत पोलिस तक्रार करण्याची मागणी केली होती, पोलिस तक्रार करूनही त्या विद्यार्थ्यांवर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही, अशी माहिती प्रा. रामराव वाघ यांनी यावेळी दिली.

 निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर, ९ सप्टेंबर रोजी पुन्हा छाननी झाली, यावेळी देखील शिशिर परब याने प्रा. अँथनी विएगस यांना थेट केबिनमध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ केली, तसेच त्यांचा खुर्चीच्या बाजूला थुकण्याचा प्रकार केला. त्यांना धमकविण्यात आले. पोलिस यावेळी उपस्थीत होते, परंतु त्यांनी याकडे जास्त लक्ष दिले नाही. यावरून सिद्ध होते की त्या विद्यार्थ्यांना राजकीय पाठिंबा मिळत आहे. तसेच वारंवार विएगस यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे. हे आम्ही आता सहन करणार नाही, त्यामुळे त्वरित त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही प्रा. वाघ यांनी पुढे सांगितले. 

 एनएसयुआयने देखील या कृत्याचा निषेध केला (चौकट करणे) गोवा विद्यापीठाच्या निवडणुकी दरम्यान विद्यार्थि कल्याण संचालकांवर दबाव आणण्याचे काम भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे. संचालकांना धमकवणारा विद्यार्थि हा अभाविपशी निगडित आहे. त्यांच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो, तसेच अभाविपला निवडणुकांपासून दूर ठेवण्याची मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती एनएसयुआय गोवा प्रमुख नौशाद चौधरी यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी