लोकसभा अधिवेशनात लाचखोरी प्रमुख मुद्दा
By Admin | Updated: July 21, 2015 02:18 IST2015-07-21T02:17:58+5:302015-07-21T02:18:08+5:30
मडगाव : वसुंधरा राजे व सुषमा स्वराज यांच्या कारनाम्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर खालावलेली भाजपाची प्रतिमा आणि त्यातच पडलेली व्यापमं घोटाळ्याची भर यामुळे ऐन संसद

लोकसभा अधिवेशनात लाचखोरी प्रमुख मुद्दा
मडगाव : वसुंधरा राजे व सुषमा स्वराज यांच्या कारनाम्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर खालावलेली भाजपाची प्रतिमा आणि त्यातच पडलेली व्यापमं घोटाळ्याची भर यामुळे ऐन संसद अधिवेशनावेळी बॅकफूटवर गेलेल्या भाजपासाठी लुईस बर्जर लाचखोरी हा आयता हाती मिळालेला प्रबळ मुद्दा ठरला असून येत्या लोकसभा अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याचे संकेत मिळू लागले आहेत. या दृष्टीने सध्या भाजपाची व्यूहरचना चालू आहे. हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी देण्यामागे हाच हेतू असल्याचे सांगितले जाते.
दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी आपण हा मुद्दा लोकसभेत चर्चेत आणू, असे ‘लोकमत’ला सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील हा महत्त्वाचा मुद्दा असून यावर संसदेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
सध्या हे प्रकरण राष्ट्रीय प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा मुद्दा बनला असून सध्या प्रमुख राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी (पान २ वर)