शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नद्यांचा विषय पेटल्यानंतर भाजपाकडून लोकप्रतिनिधींचे ब्रेन वॉशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 18:56 IST

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ठराव घेण्याची मोहीमच सुरू केल्यानंतर भाजपाने बुधवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत राज्यभरातील आपल्या सगळ्य़ा पंच, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हा पंचायत सदस्यांची एकत्र बैठक घेतली व कोळसा आणि राष्ट्रीयीकरण या दोन विषयांबाबत या लोकप्रतिनिधींचे ब्रेन वॉशिंग केले.

पणजी : राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ठराव घेण्याची मोहीमच सुरू केल्यानंतर भाजपाने बुधवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत राज्यभरातील आपल्या सगळ्य़ा पंच, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हा पंचायत सदस्यांची एकत्र बैठक घेतली व कोळसा आणि राष्ट्रीयीकरण या दोन विषयांबाबत या लोकप्रतिनिधींचे ब्रेन वॉशिंग केले. ठराव घेण्याची मोहीम रोखण्यासाठी पाऊले उचलावीत असे या बैठकीत ठरले.

नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आलेले नाही. नद्यांना राष्ट्रीय महत्त्व दिले गेले आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या बैठकीत सांगितले. काही पंच, सरपंच, नगराध्यक्ष यांनी आपल्या शंका या बैठकीत उपस्थित केल्या. नद्यांचे राष्ट्रीयीकरण असे कुठेच म्हटलेले नाही, असे मुख्यमंत्र्यांकडून व भाजपाकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच त्याबाबतची कागदपत्रेही दाखविण्यात आली. एखाद्या सार्वजनिक विषयाबाबत पंच, सरपंच, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींचे ब्रेन वॉशिंग करण्यासाठी भाजपाने घेतलेली ही पहिलीच बैठक आहे. कुणी तरी एकटा ठराव मांडतो व मग तो संमत केला जातो, त्याविषयी सर्व पंच सदस्यांना माहितीच असत नाही. यापुढे अशा प्रकारे ठराव संमत न करता त्याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, असा सल्ला भाजपाच्या नेत्यांनी लोकप्रतिनिधींना दिला.

राज्यातील सहा नद्यांचे केंद्र सरकारने राष्ट्रीयीकरण केले अशी लोकांची भावना बनली आहे. काही एनजीओंनी या विषयावरून रान उठविले असून गोव्यातील सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा विषय हा कोळसा हाताळणीच्या विस्ताराशीसंबंधित आहे, असा दावा आंदोलन करणा-या एनजीओकडून केला जात आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ठराव घेतले आहेत. वास्कोतील कोळसा हाताळणीचे परिणाम लोक भोगत असल्याने कोळसा हाताळणीचा विस्तार होऊ नये असेही लोकांना वाटते. विरोधी काँग्रेस पक्षाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले असून गोव्यातील सहा नद्या कथित राष्ट्रीय महत्त्वाच्या कलमामधून वगळाव्यात अशी मागणी केली आहे.

दरम्यान, भाजपाने बोलविलेल्या बैठकीत शेकडो लोकप्रतिनिधी सहभागी झाले. ज्या पंचायती, पालिका, जिल्हा पंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत, त्यांच्यासाठीच ही बैठक होती. वास्कोसह काणकोण, कुडचडे, वाळपई, म्हापसाचे नगराध्यक्ष तसेच पेडणोच्या उपनगराध्यक्षांनी बैठकीत भाग घेतला. काहीजणांनी मुख्यमंत्र्यांकडे शंका उपस्थित केल्या व त्यांचे निरसन करून घेतले.

नद्यांना राष्ट्रीय महत्त्व दिले गेले असून त्याबाबत त्रिपक्षीय करारही होईल. गोव्याच्या हिताच्यादृष्टीने तो करार असेल. कोळसा हाताळणीच्या विस्ताराला आक्षेप घेणारे पत्र आपण गेल्या ऑगस्टमध्येच केंद्र सरकारला लिहिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. जो अपप्रचार काहीजण करत आहेत, त्यास कुणी बळी पडू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी पंच, सरपंचांना विषय समजावून सांगितला. यापुढे काही पंचायती संमत केलेले ठराव मागे घेण्याचीही शक्यता सुत्रांनी या बैठकीनंतर व्यक्त केली.

सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्वागत केले. खासदार नरेंद्र सावईकर यांनीही विचार मांडले. राज्य सरकारच्या धोरणांसोबत ठाम रहावे असे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना करण्यात आले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा