दोघे युवक जागीच ठार
By Admin | Updated: November 14, 2015 01:52 IST2015-11-14T01:50:19+5:302015-11-14T01:52:16+5:30
मडगाव : घोगळ येथील बोलसे सर्कलजवळ अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले. भगवन पटासिंग व मनीष पिल्ले अशी मृतांची नावे आहेत.

दोघे युवक जागीच ठार
मडगाव : घोगळ येथील बोलसे सर्कलजवळ अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले. भगवन पटासिंग व मनीष पिल्ले अशी मृतांची नावे आहेत. लाकडाचे ओंडके भरून येणारा ट्रक आणि स्प्लेंडर दुचाकीमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाने बोलसे सर्कलला वळण घेताना मागून दुचाकीची ट्रकला धडक बसली. ट्रकमधील ओंडके डोक्यावर आपटल्याने दुचाकीवरील दोघेहीजण तोल जाऊन खाली रस्त्यावर पडले. हा अपघात इतका जबरदस्त होता की मृतांपैकी एकाच्या डोक्याचा चेदामेंदा झाला होता. मोटरसायकल फोंडा येथील वाहतूक खात्यात नोंदणीकृत आहे.
मृतही याच तालुक्यातील शिरोडा भागातील असावेत, अशी शक्यता आहे. मात्र, नेमकी ओळख स्पष्ट झालेली नाही. दररोज हे युवक सायंकाळी याच भागातून राशोलमार्गे फेरीतून जात होते, अशी माहिती अपघातस्थळी लोकांकडून मिळाली. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेर्णा येथे हे दोघे युवक कामाला होते. सायंकाळी काम आटोपून राशोल फेरीमार्गे ते शिरोडा येथे परतत असत.
अपघातानंतर संतप्त लोकांनी टिप्पर ट्रकवर दगडफेक करून काचाही फोडल्या. अपघातानंतर या भागातील वाहतूकही काही वेळ खोळंबून राहिली.
(प्रतिनिधी)