बोगस महिला डॉक्टरच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: October 5, 2014 01:22 IST2014-10-05T01:14:55+5:302014-10-05T01:22:42+5:30
सावर्डे : ४७ जणांना नोकरीचे आमिष दाखवून २५ लाख २१ हजार रुपयांना गंडा घातलेल्या झरीवाडा-दवर्ली, मडगाव येथील पूजा दामोदर शंके (३३) या महिलेला केपे

बोगस महिला डॉक्टरच्या कोठडीत वाढ
सावर्डे : ४७ जणांना नोकरीचे आमिष दाखवून २५ लाख २१ हजार रुपयांना गंडा घातलेल्या झरीवाडा-दवर्ली, मडगाव येथील पूजा दामोदर शंके (३३) या महिलेला केपे न्यायालयाने आणखी चार दिवसांच्या रिमांडावर कुडचडे पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर माधेगाळ-काकोडा येथील दुसरा एक अल्पवयीन साथीदार अपना घरात आहे.
आपण डॉक्टर असल्याचे भासवून या दोघांनी रिवण येथे लोबो निवास या फिलीप लोबो यांच्या घरात पहिल्या मजल्यावर व खाली एक रुम भाड्याने घेऊन तेथे नर्सिंग प्रशिक्षण केंद्र उघडले होते. या केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर बांबोळी येथील गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून नोकरी देण्यात येणार, अशी बतावणी करून एकूण ४७ जणांकडून २५ लाख २१ हजार रुपये उकळले होते.
या प्रकरणी पंचवाडी-शिरोडा येथील सुप्रिया देसाई हिने कुडचडे पोलिसांत लेखी तक्रार केल्यानंतर कुडचडे पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली होती.
शनिवारी पोलिसांनी रिवण येथे जाऊन पंचनामा केला व आॅफिसवजा प्रशिक्षण केंद्रातील सर्व साहित्य जप्त करून ते कुडचडे येथे आणले. या साहित्यात खाटा, कपाटे, काउन्टर, टेबले, खुर्च्या, लस टोचणीच्या सिरिंज, ड्रीप लावण्यासाठी वापरण्यात येणारे स्टॅण्ड, औषधे, विविध प्रकारची रुग्ण तपासणीची यंत्रे यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बोगस डॉक्टरांनी कुडचडे येथील एका स्टेशनरी दुकानातून स्टेशनरी नेली होती. तसेच त्यांच्याकडून डॉक्टरांचे रबर स्टॅम्पही बनवून घेतल्याचे उघड झाले आहे. आलिशान गाडीतून येऊन अल्पवयीन आरोपी स्टेशनरीची आॅर्डर देत होता. सध्या या स्टेशनरी दुकानदाराचे सुमारे ५१ हजार रुपये देणे असल्याची माहिती मिळाली.
ऐटीत शॉपमध्ये येऊन त्याने खरेदी केल्याने दुकानमालकास संशयच आला नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, दोघेही बोगस डॉक्टर निघाल्याने त्याला ५१ हजारांना गंडा पडला असून बोगस रबर स्टॅम्प करून दिल्याप्रकरणी त्याला आता पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे.
कुडचडे पोलिसांनी ४७ जणांना येत्या ७ आॅक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात बोलावले असून त्या दिवशी आरोपी व त्यांची समोरासमोर जबानी घेतली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कुडचडे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पूजा नावाची एक डॉक्टर असून या बोगस डॉक्टरांनी नोकरीचे आमिष दाखविलेल्या व्यक्तींना तिचा फोन क्रमांक दिला होता. काही जणांकडून त्या खऱ्या डॉक्टरांना फोन येऊ लागल्याने तिने थेट कुडचडे पोलीस स्टेशन गाठले होते. यानंतर हे बिंग फुटले. खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारी नर्स सुप्रिया देसाई जाळ्यात अडकली.
फसलेल्यांची नावे -
१) सुप्रिया देसाई, एक लाख, २) सलीम मुल्ला, एक लाख, ३) रफिक पतियाळ, ५0 हजार, ४) शबाना खान, ४ हजार, ५) मंजप्पा पाटील, ३0 हजार, ६)दस्तगीर रहमानभाई, १५ हजार, ७) स्वप्नेश कुट्टीकर, ५0 हजार, ८) सारिका केवणकर, ५0 हजार, ९) लक्ष्मण नाईक, ५0 हजार, १0), खुतिजा पतियाळ, ४ हजार, ११) नाजमुलसेहर मदरकांडी, ३ हजार, १२) मेहबूबी मुल्ला, ५0 हजार, १३) हुसेन सय्यद, ५0 हजार, १४) हलिमा शेख, ५0 हजार, १५) गौस्पक मुल्ला, ५0 हजार, १६) राम नाईक, २0 हजार, १७) नीलेश वेळीप, ६0 हजार, १८) शशी वेळीप, ६0 हजार, १९) प्रेमानंद खांडेपारकर,
६0 हजार, २0) लिया नाईक, ४५ हजार, २१) दिनेश गावकर, ७0
हजार, २२) राजेश बोरकर, ७0 हजार, २३) पुरुषोत्तम वेळीप, ५0 हजार,
२४) शीतल वेळीप, ५0 हजार, २५) तनुजा गावकर, ८0 हजार, २६) संतोष वेळीप, ५0 हजार, २७) प्रभाकर गावकर, ७0 हजार, २८) अक्षया वेळीप, ५0 हजार, २९) उमेश गावकर, ७0 हजार, ३0) सुकांत कवळेकर, ५0 हजार, ३१) नम्रता गावकर, ४0
हजार, ३२) सविता कवळेकर, ६५ हजार, ३३) रेश्मा गावकर, ५0 हजार, ३४) संदेश कवळेकर, ५0 हजार, ३५) शशी वेळीप, ५0 हजार, ३६) रोहन गावकर, ५0 हजार, ३७) विशाल पैंगीणकर, ५0 हजार, ३८), राजेंद्र गावकर, ५0 हजार, ३९) स्वप्ना पैंगीणकर, ५0 हजार, ४0) सुभाष गावकर, ६0 हजार, ४१) प्रदीप गावडे, ६0 हजार, ४२) गौसावी मुल्ला, २0 हजार, ४३) हसन सय्यद, एक लाख, ४४) लाला सौदागर, ९५ हजार, ४५) प्रदीप भुसारे, एक लाख, ४६) सफी सय्यद, २0 हजार, ४७) व्यंकटेश्वरलू कोट्टे, एक लाख.
(लो.प्र.)