गेस्ट हाउसमधून देह व्यापार

By Admin | Updated: December 4, 2015 01:25 IST2015-12-04T01:25:36+5:302015-12-04T01:25:45+5:30

पणजी : पोलिसांना चकविण्यासाठी सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांनी वेश्या व्यवसायाचे नवे तंत्र विकसित केल्याचे दिसून

Body trade through guest house | गेस्ट हाउसमधून देह व्यापार

गेस्ट हाउसमधून देह व्यापार

पणजी : पोलिसांना चकविण्यासाठी सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांनी वेश्या व्यवसायाचे नवे तंत्र विकसित केल्याचे दिसून आले आहे. राज्यातील खासगी गेस्ट हाउसेस ही सेक्स रॅकेटचे अड्डे बनत असल्याचे गुन्हा अन्वेषण विभागाने अलीकडेच कळंगुट येथे केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे.
बिगर गोमंतकीय दलाल गोव्यात येऊन राहतात. चार-पाच गेस्ट हाउसेस भाड्याने घेतात. या गेस्ट हाउसमध्ये मुंबई, पश्चिम बंगाल व ईशान्य भारतातील युवती आणून ठेवतात आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने देहविक्रीचा व्यवसाय करतात. एका गेस्ट हाउसमध्ये सात-आठ खोल्या असतात. गिऱ्हाईकांना थेट या गेस्ट हाउसचा पत्ता दिला जातो. त्यासाठी त्यांना अगोदर निम्मे पैसे फेडावे लागतात.
कळंगुटमध्ये पकडण्यात आलेल्या दलालांत दोन महिलांचाही समावेश आहे. तसेच ५ पुरुषांनाही पकडण्यात आले होते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई चालू ठेवली. त्यात, या रॅकेटच्या सूत्रधाराला गजाआड करण्यात आले. दीपक बनिक नावाच्या या सूत्रधाराला अटक केल्यानंतर हे रॅकेट कशा प्रकारे चालू होते, याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची कबुलीही दीपकने दिली, अशी माहिती क्राईम ब्रँचकडून देण्यात आली.
या सेक्स रॅकेटची व्याप्ती बहुराज्यीय असून गोव्यातील सर्व सूत्रे दीपक हाताळत होता. गरजेनुसार युवतींना गोव्यात आणणे आणि गोव्यातून त्यांना बाहेर पाठविणे अशी कामे तो करीत होता. त्याच्या आणखी एका साथीदारालाही पोलिसांनी पकडले आहे; परंतु काही तांत्रिक गोष्टींमुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वेश्या व्यवसायाची ही मुळे कुठपर्यंत पोहोचली आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न क्राईम ब्रँचकडून सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Body trade through guest house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.