भंगारअड्ड्याच्या मालकीवरून एकाचा खून

By Admin | Updated: February 12, 2016 03:57 IST2016-02-12T03:53:53+5:302016-02-12T03:57:24+5:30

म्हापसा : गोठणीचा व्हाळ-करासवाडा येथे भंगारअड्ड्याच्या मालकीवरून दोघा भावांतील वादाचे पर्यवसान खुनात झाले. पुतण्याने काकाच्या मेहुण्याचा खून केला.

The blood of one of the owners of the barnyard | भंगारअड्ड्याच्या मालकीवरून एकाचा खून

भंगारअड्ड्याच्या मालकीवरून एकाचा खून

म्हापसा : गोठणीचा व्हाळ-करासवाडा येथे भंगारअड्ड्याच्या मालकीवरून दोघा भावांतील वादाचे पर्यवसान खुनात झाले. पुतण्याने काकाच्या मेहुण्याचा खून केला. या वेळी झालेल्या हाणामारीत आठजण जखमी झाले असून चार गंभीर जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
करासवाडा येथील बांदेकर पेट्रोल पंपच्या मागे असलेल्या भंगारअड्ड्याच्या मालमत्तेवरून झालेल्या या मारामारीत चॉपर, लोखंडी सळ्या तसेच दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आठजणांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यातील पाचजणांना अटक केली असून तिघांवर उपचार सुरू आहेत. अटक केलेल्यांना शुक्रवारी रिमांडसाठी न्यायालयासमोर दाखल करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, महंमद उमोद अली सिद्दिकी व औकत उमोद अली सिद्दिकी या दोन भावांचे भंगारअड्ड्याच्या मालकी हक्कावरून भांडण झाले होते.

Web Title: The blood of one of the owners of the barnyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.