‘मोपा’विरोधात रक्ताने सह्या

By Admin | Updated: October 13, 2014 02:17 IST2014-10-13T02:16:09+5:302014-10-13T02:17:23+5:30

ठराव मंजूर : कासावली ग्रामसभेत मेगा हॉटेललाही मोठा विरोध

With blood in Mopa | ‘मोपा’विरोधात रक्ताने सह्या

‘मोपा’विरोधात रक्ताने सह्या

वास्को : कासावलीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत मोपा विमानतळास तसेच मेगा प्रकल्पांना विरोध करणारे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे मोपा विमानतळास विरोध करणाऱ्या ठरावावर काही ग्रामस्थांनी रक्ताने सह्या करून आपला विरोध दर्शविला.
कासावली - कुठ्ठाळी - वेळसाव पंचायतीची ग्रामसभा कडक बंदोबस्तात घेण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी मोपा विमानतळास विरोध दर्शवून दाबोळी विमानतळाचे समर्थन केले. तसेच यापुढे पंचायत क्षेत्रात हॉटेल किंवा मेगा प्रकल्पांना मान्यता न देण्याचे ठरविण्यात आले. पंचायत क्षेत्रात सध्या असलेल्या हॉटेलवाल्यांनी पर्यावरण तत्त्वांची पायमल्ली केलेली असून प्रथम या हॉटेलवाल्यांना आपल चुका सुधारण्यास भाग पाडावे. या हॉटेल्समुळे या भागातील ग्रामस्थ आणि हॉटेल व्यवस्थापन यांच्यामध्ये वारंवार खटके उडत असल्याने या भागातील शांतता बिघडत चालली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
या सभेनंतर डॉ. मार्कोनी कुर्रैया व इतर १० ग्रामस्थांनी मोपा विमानतळाला विरोध दर्शविण्यासाठी बोटाला सुई लावून रक्ताच्या थेंबाने अंगठ्याची निशाणी उमठवली. हे ठरावपत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योसिंता कार्दोज होत्या. तसेच उपसरपंच डेयातीन गोसीस, सेक्रेटरी किरण मेस्ती उपस्थित होत्या. सभेवेळी कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)

Web Title: With blood in Mopa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.