शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील नव्या आमदार, मंत्र्यांना भाजपाकडून शिस्तीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 12:51 IST

काँग्रेसमधून जे अलिकडेच भाजपामध्ये आले आहेत, त्यांच्यासाठी व उर्वरित भाजपा मंत्री, आमदारांसाठीही भाजपाने नुकताच दोन दिवसांचा अभ्यास वर्ग घेतला.

ठळक मुद्देकाँग्रेसमधून जे अलिकडेच भाजपामध्ये आले आहेत, त्यांच्यासाठी व उर्वरित भाजपा मंत्री, आमदारांसाठीही भाजपाने नुकताच दोन दिवसांचा अभ्यास वर्ग घेतला. नव्या आमदार व मंत्र्यांना शिस्तीचे आणि भाजपाचे तत्त्वज्ञान पुढे नेण्याचे धडे दिले गेले.काँग्रेसमधून दहा आमदार भाजपामध्ये गेले आहेत. त्यातील एकटे विद्यमान भाजपा उपमुख्यमंत्री तर दोघे मंत्री आहेत.

पणजी - काँग्रेसमधून जे अलिकडेच भाजपामध्ये आले आहेत, त्यांच्यासाठी व उर्वरित भाजपा मंत्री, आमदारांसाठीही भाजपाने नुकताच दोन दिवसांचा अभ्यास वर्ग घेतला. भाजपा हा कसा कार्यकर्त्यांचा व बूथ समित्यांचा पक्ष आहे हे भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून या अभ्यास वर्गात सर्वांना सांगितले गेले. तसेच नव्या आमदार व मंत्र्यांना शिस्तीचे आणि भाजपाचे तत्त्वज्ञान पुढे नेण्याचे धडे दिले गेले.

काँग्रेसमधून दहा आमदार भाजपामध्ये गेले आहेत. त्यातील एकटे विद्यमान भाजपा उपमुख्यमंत्री तर दोघे मंत्री आहेत. इतरांना सरकारी महामंडळे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपाचा मोठा  पराभव झाला. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे देशाचे संरक्षण मंत्री होते. 2017 पासून आतापर्यंत भाजपाने काँग्रेसमधून तेरा आमदारांना भाजपामध्ये घेतले. त्या शिवाय मगो पक्षाच्या दोघा आमदारांना भाजपामध्ये प्रवेश दिला गेला. यामुळे भाजपाची आमदार संख्या तेरावरून सत्तावीसपर्यंत पुढे गेली. या सर्व सत्तावीस आमदारांसाठी भाजपाने निवासी स्वरुपाचा अभ्यास वर्ग घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि अन्य सर्व आमदार, मंत्री या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले.

भाजपाचे संघटन मंत्री सतिश धोंड यांनी सर्व मंत्र्यांना भाजपाच्या वाढीचा इतिहास सांगितला. गोव्यात आम्ही 1989 साली केवळ चौघांनीच प्रथम भाजपाचे काम सुरू केले होते. आता भाजपा सत्तेवर आहे. कारण आम्ही शिस्तीत भाजपाचे काम वाढवत नेले. सामुहिक प्रयत्नांमुळे भाजपाची वाढ झाली. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तुम्हा मंत्री, आमदारांना आम्ही प्रमुख कार्यकर्ते समजतो. तुमच्या मतदारसंघात बुथ स्तरापासून भाजपाची संघटना बांधा, कार्यकर्त्यांना कायम सांभाळा, अशी सूचना धोंड यांनी केली. दर निवडणुकीवेळी पन्नास टक्के आमदार पराभूत होतात व पन्नास टक्के नवे निवडून येतात. कारण कार्यकर्त्यांशी आमदारांचा संवाद संपलेला असतो, असे धोंड म्हणाले. 2022 साली गोवा विधानसभेच्या पुन्हा निवडणुका होतील तेव्हा भाजपाला विधानसभेच्या चाळीसपैकी तीस मतदारसंघ जिंकायचे आहेत, असे धोंड यांनी अभ्यास वर्गात सर्व आमदारांना सांगितले आहे. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर