शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीतील धुसफुशीमुळे लोकसभेवेळी गोव्यात भाजपची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 21:59 IST

येत्या लोकसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी भाजप करत असतानाच...

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडीत स्व. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाच्या वादावरून जी धुसफूस सुरू झाली आहे, त्याचा परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीवेळी दिसून येण्याची दाट शक्यता आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने सध्या बंडाची भूमिका घेतलेली नाही पण या पक्षाचे मंत्री पुतळ्य़ाच्या विषयावरून अस्वस्थ झाले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी भाजप करत असतानाच गोवा फॉरवर्ड पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकीवेळी आपले महत्त्व भाजपला दाखवून द्यायचे असे ठरवले असल्याची माहिती राजकीय सुत्रंकडून मिळाली.

स्व.   सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेसमोर उभा करायलाच हवा, अशी भूमिका गोवा फॉरवर्ड पक्षाने कायम ठेवली आहे. भाजपला ही भूमिका मान्य नाही. तथापि, सध्या बंडाची भूमिका न घेता येत्या लोकसभा निवडणुकीवेळी गोवा फॉरवर्ड पक्ष आपले राजकीय उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी माहिती मिळते. काँग्रेसच्या काही आमदारांनाही तसेच वाटते. गोवा फॉरवर्ड पक्षाला सध्या तरी भाजपचे आमदार मायकल लोबो यांची साथ मिळाली आहे. लोबो यांच्यामार्फत सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविषयी येत्या विधानसभा अधिवेशनात ठराव आणण्याचा प्रयत्न गोवा फॉरवर्ड करणार आहे याची भाजपला कल्पना आली आहे. 

सध्या उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत पण काँग्रेसकडे व बिगर भाजप पक्षांकडे मिळून जास्त विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या जे बिगर भाजप मंत्री व अपक्ष सत्तेत आहेत, ते लोकसभा निवडणुकीवेळी आपल्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आघाडी मिळवून कशी काय देतील असा प्रश्न काही आमदारांमध्ये सध्या चर्चेत आहे. दक्षिण गोवा मतदारसंघात यावेळी भाजपची जास्त कसोटी लागेल, असा सूर गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सध्या आहे. मगो पक्षातही तशाच प्रकारची चर्चा आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातही गोवा फॉरवर्ड, अपक्ष, मगोप यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उत्तरेत यावेळी काँग्रेस पक्ष कोणता उमेदवार उभा करील त्यावर बरेच काही अवलंबून आहे.

भाजपकडून मतदारसंघांचे वाटप (चौकट)

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भुपेंद्र यादव आणि राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस बी एल संतोष हे सध्या गोव्यात असून त्यांनी भाजपच्या सर्व मंत्री, आमदार, खासदार व प्रमुख पदाधिका:यांची बुधवारी 

येथे बैठक घेतली. भाजपच्या प्रत्येक मंत्री, आमदार व खासदाराला यावेळी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघांची जबाबदारी वाटून देण्यात आली. या मतदारसंघांमध्ये भाजपच्या मंत्री व आमदारांनी लक्ष घालून तिथे संघटनात्मक काम वाढविण्यासाठी समन्वयकाची भूमिका बजवावी, अशी सूचना पक्षाने केली आहे. मंत्री मडकईकर याना ताळगाव, माविन गुदिन्हो याना कुडतरी, विश्वजित राणो याना पर्ये, प्रविण झाटय़े याना मडगाव, विनय तेंडुलकर याना फोंडा व काणकोण, नरेंद्र सावईकर याना शिरोडा, मायकल लोबो याना सांतआंद्रे, ग्लेन तिकलो याना नावेली, निलेश काब्राल याना केपे अशा प्रकारे आमदारांवर मतदारसंघांच्या जबाबदा:या दिल्या गेल्या आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीकोनातून पक्ष संघटना काँग्रेसच्याही ताब्यातील मतदारसंघांमध्ये जास्त बळकट करावी असे ठरले आहे. मुख्यमंत्री र्पीकर हेही बैठकीला उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाElectionनिवडणूक